Kolhapur Assembly News : करवीर विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात होत आहे. तर महायुतीला सर्वाधिक धोका हा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांचा आहे. दिवंगत काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र राहुल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहानुभूतीच्या जोरावर त्यांची लोकप्रियता अधिक आहे. मात्र महायुतीच्या जोरावर विकासकाम खेचून आणण्याची यशस्वी चाल चंद्रदीप नरके यांनी खेळल्याने मतदारसंघातील लढत चुरशीची बनली आहे.
करवीर मतदारसंघातील लढत ही दुरंगी असली तरी तिसरा उमेदवाराची निर्णय ही दोन उमेदवारांच्या भवितव्याला कलाटणी देऊ शकते. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देणारा करवीर विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत दिशा बदलेल का याची उत्सुकता आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेला जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांची उमेदवारी एका उमेदवाराचा पत्ता कापणार असून, एका उमेदवाराला विजयाचा गुलाल लावणार आहे.
साहेबांच्या माघारी आता आमची जबाबदारी, अशी भावनिक साद घालून राहुल पाटील यांनी करवीर मधील वातावरण चांगलेच कव्हर केले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अस्तित्व नसले तरी शेकाप आणि पवार यांना मानणारा गट वेगळा आहे. शिवाय निष्ठावंत शिवसैनिक या मतदारसंघात जागरूक आहे. मतदारसंघातील विद्यमान आमदार विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील आसगावकर यांनी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मताधिक्याचा दावा केला जात आहे.
करवीर मतदारसंघातील लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी, कोल्हापूर गगनबावडा राज्य मार्ग, यासह अनेक विकास कामांची प्रचंड मेहनत ही नरके यांच्या जमेची बाजू आहे. त्या जोरावर वेळ आपली आहे ही स्लोगन घेऊन नरके निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सहानुभूती विरोधात विकास कामांचा मुद्दा घेऊन नरके यांनी वातावरण तापवले आहे. विजयाचा विश्वास घेऊन नरके मैदानात उतरलेत पण मित्रपक्ष असलेले जनसुराज्य शक्तीने (Jansurajya Shakti) मार्गात अडथळा निर्माण केला आहे. पन्हाळा, धामणी खोऱ्यातून आमदार विनय कोरे, जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांनीही मताधिक्याचा दावा केला आहे. यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. पन्हाळ्यातून कोरे गटाचे मतदान निवडणुकीतील विजयाचे चित्र बदलणार असल्याची स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.