Ajit Pawar : अजितदादा ‘या’ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणार; मैत्रीपूर्ण लढतींबाबत मोठं विधान 

Maharashtra Assembly Election Mahayuti NCP BJP Shiv Sena : नवाब मलिक हे मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकांना भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महायुती म्हणून सामोरे जात आहेत. मात्र, राज्यातील काही जागांवर महायुतीमध्ये लढत होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे माजी नवाब मलिक रिंगणात असलेला मानखुर्द शिवाजीनगर.

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. तर या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उमेदवार आहे. सेनेसह भाजपने या मतदारसंघात मलिकांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मलिकांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमधील प्रमुख नेतेच एकमेकांविरोधात या मतदारसंघात उभे ठाकणार आहेत.

Ajit Pawar
Sadabhau Khot : "माझ्या बोलण्याचा हेतू..." पवारांबाबातच्या वादग्रस्त वक्तव्यावर सदाभाऊ खोतांची जाहीर दिलगिरी

अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवाब मलिक यांना आम्ही अधिकृत उमेदवारी दिली आहे. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. त्यांच्यावर आरोप झाले आहेत. मात्र अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भाजप आणि सेनेने भूमिका घेतली आहे. तो त्यांचा विषय असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितले. (Mahayuti)

मैत्रीपूर्ण लढतींबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात दोन-चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. त्या होऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र काही ठिकाणी त्याला यश आले नाही. भोर मध्ये अधिकृत बंडखोरी नाही.

Ajit Pawar
Nana Patole : राहुल गांधी यांना अडकवण्याचे भाजपचे प्रयत्न; नाना पटोलेंनी भाजपवर डागली तोफ..!

पुरंदर, सिंदखेड, श्रीरामपूर आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. मैत्रीपूर्ण लढतीबाबत कोल्हापूर येथे प्रचाराचा नारळ फोडला, त्यावेळी चर्चा झाली. आज दुपारनंतर मी मुंबईला जाणार असून सायंकाळी त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com