PM Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

PM Modi: मोदीजी, परीख पुलासाठी लाइव्ह या! कोल्हापुरात झळकले बॅनर; नेमकं काय प्रकार?

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापूर शहरात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे मध्यवर्ती परिसरात असणारा बाबूभाई परीख पूल. नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असतो. पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर किंवा वाहतूक कोंडी झाल्यानंतर हमखास याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतात. कोल्हापुरातील एकमेव असा पूल असेल ज्या पुलाखालून वाहतूक सुरू असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो समस्येच्या गरजेचा सापडला आहे. त्याकडे कोणत्याच राजकीय प्रतिनिधीचे लक्ष नसल्याने कोल्हापूरकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बॅनर लावून विनंती केली आहे.

परीख पुलाची समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूरकरांनी नामी शक्कल लढवत थेट नरेंद्र मोदी यांनीच हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही भावना डोळ्यांसमोर ठेवून " माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी परीख पुलासाठी कृपया लाईव्ह या!" अशा आशयाचे फलक झळकवले आहेत.

कोल्हापूरच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा पूल म्हणून बाबूभाई परीखपुलाची ओळख आहे. त्यामुळे साहजिकच या मार्गावर वर्दळ असते. महापालिका प्रशासन ही त्याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. शिवाय पुलावरून रेल्वे रूळ असल्याने त्या ठिकाणी कामे करण्यासदेखील काही अडथळे आहेत. अशा परिस्थितीत थेट केंद्रातून मार्ग निघावा यासाठी कोल्हापूरकरांनी अशी शक्कल लढवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परीख पुलावर हॅरी पॉटर ...

कोल्हापूर शहरातील परीख पूल नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. कोल्हापुरच्या इंस्टाग्राम यूजर करताना त्यावर रील बनवला होता. या रील मध्ये चक्क हॅरी पॉटर च्या रूपात परीख पूल ओलांडल्यासंदर्भात रील तयार केला होता. समाजमाध्यमावर तो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्या पुलासंदर्भात अनेक गंभीर बाबी नेटिजन्सने समोर आणल्या होत्या.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT