Shiv Sena : 'कचोरीताई' चकल्या जेलमध्येच खाणार; म्हात्रेंनी डिवचलं; पेडणेकर म्हणाल्या," पक्ष निष्ठेची चकली बनवेन, पण...

Sheetal Mhatre Vs Kishori Pednekar : पेडणेकरांना जशास तसे उत्तर
Sheetal Mhatre Vs kishori pednekar
Sheetal Mhatre Vs kishori pednekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना समन्स बजावले आहे. पेडणेकर यांना आज (बुधवारी) चौकशीसाठी बोलावण्यात आहे. त्यांना बेलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

पेडणेकर यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या, शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी पेडणेकरांना डिवचलं आहे. त्याला पेडणेकरांना जशास तसे उत्तर दिले आहे. शिंदे-ठाकरे गटाच्या या दोन्ही नेत्यांचे टि्वटर वॉर रंगल्याने नेटकऱ्यांनी सहभाग घेत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

पेडणेकरांनी ईडीने समन्स पाठवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शीतल म्हात्रेंनी टि्वट केले. "कचोरीताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं…दिवा पण फडफडून विझणार वाटतं," अशा शब्दांत किशोरी पेडणकरांना (Kishori Pednekar) म्हात्रेंनी डिवचलं आहे. त्याला सडेतोड उत्तर पेडणेकरांनी दिले आहे. म्हात्रेंचा एकेरी उल्लेख करीत पेडणेकरांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

"शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन, पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे. मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Covid Scam)

(Edited By Mangesh Mahale)

Sheetal Mhatre Vs kishori pednekar
Gram Panchayat Election 2023: सरपंच कोणाचा? दावे-प्रतिदाव्यांनी राजकारण पेटले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com