Kolhapur News: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने राज्यातील जिल्हा पातळीवरील जिल्हाध्यक्षांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत काही पदाधिकाऱ्यांना मात्र डच्चू दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. कोल्हापूरमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तर कोल्हापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर-हातकणंगले (पूर्व) जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजवर्धन निंबाळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता येत्या काळात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे याचा पक्षाला किती फायदा होईल, हे येत्या काळातच पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 'मिशन 45' ठेवलं आहे. त्यामुळे भाजप सध्या पक्ष वाढीसाठी जोरदार हालचाली करत असून नव्या चेहऱ्यांना संधी देत आहे. तर काही दिवसांपूर्वीच भाजपने मतदार संघनिहाय जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दिल्या होत्या. त्यानंतर आता थेट जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.