Jalgaon BJP News : जळगाव जिल्ह्यात भाजपचे तब्बल तीन अध्यक्ष; शहरात पहिल्यांदाच महिलेला संधी!

BJP District President News : शहराध्यक्षपदी पक्षाने प्रथमच महिलेला संधी दिली आहे.
Jalgaon BJP News
Jalgaon BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : भारतीय जनता पक्षांकडून (BJP) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या विविध जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. यात विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात तीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. (latest Marathi News)

Jalgaon BJP News
BJP Appointments: भाजपने सुधाकर कोहळेंचे केले पुनर्वसन, दिली मोठी जबाबदारी

भारतीय जनता पक्षाचे नव्याने जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती जाहीर झाले आहेत. त्यानुसार जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जळकेकरमहाराज, रावेर ग्रामीण अध्यक्षपदी अमोल हरिभाऊ जावळे, तर जळगाव शहर अध्यक्षपदी नगरसेविका उज्वला किरण बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Jalgaon BJP News
BJP News : पुणे ग्रामीण बारामती शहराध्यपदी वासुदेव काळे, तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती

भाजप तर्फे जिल्ह्यात यापूर्वी जळगाव ग्रामीण व जळगाव शहर असे दोन अध्यक्ष दिले होते. यात बदल करत आता तीन अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. जळगांव व रावेर लोकसभा मतदारसंघनिहाय दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. तर शहरासाठी स्वतंत्र अध्यक्ष आहेत. जळगाव ग्रामीणसाठी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची वक्तृत्वार चांगली पकड असून एकेकाळी ते शिवसेनेचा आक्रमक चेहरा होते. ते भाजपात गेल्या चार वर्षांपासून काम करत आहेत.

Jalgaon BJP News
Ahmednagar Politics: शरद पवारांचा संग्राम जगतापांना दणका; जवळच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

रावेर ग्रामीणचे अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष, माजी खासदार (कै) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आहेत. तर जळगाव शहर अध्यक्ष उज्वला किरण बेंडाळे या भाजपच्या महापालिकेत नगरसेविका आहेत. शहराध्यक्षपदी पक्षाने प्रथमच महिलेला संधी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com