BJP Kolhapur politics : आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच भाजपने धक्का दिला आहे. गेली पन्नास वर्षांपासून मुरगुड नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रवीण सिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांना जवळ गेल्यानंतर प्रवीणसिंह पाटील यांनी थेट मुश्रीफ यांनाच ठेंगा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेत घोषणा केली. मंगळवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि जवळचे पदाधिकारी आहेत. गेल्या 50 वर्षांपासून मुरगुड नगरपालिकेवर त्यांच्या गटाची सत्ता आहे. तर मागील वर्षी प्रवीण सिंह पाटील यांना शेतकरी संघाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
माजी खासदार संजय मंडलिक यांच्याशी राजे खान जमादार यांचे बिनसल्यानंतर जमादार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढवली होती. या जवळीकतेने प्रवीण सिंह पाटील हे राजकीय भूमिकेत अस्वस्थ होते. कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका घेत प्रवीण सिंह पाटील यांनी थेट भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवीणसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने कागल तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार आहे. कागल तालुक्याचे वातावरण विविध घडामोडींनी ढवळून निघाले असताना पाटील भाजप प्रवेश करणार आहेत.
पाटील यांचे जेष्ठ बंधू गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करत मुश्रीफ गटाला बळ दिले होते. मात्र या दोन बंधूंमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दुफळी निर्माण झाल्यामुळे आता प्रवीणसिंह पाटील काय करणार याच्याकडे लक्ष होते? यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपची वाट धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.