Kolhapur BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP : CM फडणवीसांनी कौतुक केल्यामुळे कोल्हापुरातील भाजप कार्यकर्ते झाले आणखी चार्ज

BJP Membership Drive Kolhapur : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळालं तरी विधानसभा निवडणुकीत तब्बल तीन आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून मिळाले. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतल्याने भाजपचा आत्मविश्वास गगनात पोहोचला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 07 Feb : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास गमावल्यानंतर भाजपने यंदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीत अपयश मिळालं तरी विधानसभा निवडणुकीत तब्बल तीन आमदार कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून मिळाले. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतल्याने भाजपचा आत्मविश्वास गगनात पोहोचला आहे.

गल्ली ते दिल्लीपर्यंतचा कार्यकर्ता या निमित्ताने सक्रिय झाला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापुरात येऊन भाजप कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांचे कौतुक केले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) कोल्हापूर जिल्ह्यात यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेवर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपला नवीन प्रत्येक बूथ मधून 200 नवीन सदस्यांची नोंदणीचे टारगेट दिले होते.

जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाजप सदस्य नोंदणी झाली आहे. त्यामुळे भाजप हा जिल्ह्यातील देखील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी (ता.06) भाजप कार्याला भेट देत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचे मनोबल आणखी वाढवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रचंड यशामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी देखील वाढली आहे.

लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा बूथ अध्यक्ष ते भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी कायमच सक्रिय असतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाय सदस्य नोंदणीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दलही कोल्हापूर भाजपचे कौतुक केले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT