Devendra Fadnavis : ' नाना पटोले विदर्भाचा बुलंद आवाज, दाबणार असाल तर...', देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

CM Devendra Fadnavis Nana Patole :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ते कोल्हापूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले की शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसल्याचे निवेदन देण्यात आले.
Nana Patole-Devendra Fadnavis
Nana Patole-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : राज्यपालांच्या अभिभाषणावर 17 टक्के आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी नाना पटोले चर्चेत सहभागी झाले नसल्याचे दाखवर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनाही मधे खेचले.

'नानाभाऊं चर्चेत सहभाग घेतला नाही की काँग्रेसनेसुद्धा नानाभाऊंचे नाव कापलं? नानाभाऊ आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज आहे. तो दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असले तर ते बरोबर नाही', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नानाभाऊ (Nana Patole)आमचा बुलंद आवाज असल्याचे म्हणत फडणवीसांनी म्हटले की, गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे ते सध्या वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. आज ते पुन्हा एकदा पांढऱ्या कपड्यात आल्याचे देखील फडणवीसांनी म्हटले.

Nana Patole-Devendra Fadnavis
Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ; सत्ताधाऱ्यांवर हक्कभंगाचा आरोपानंतर विरोधकांचा सभात्याग

शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले की ते कोल्हापूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले की शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नसलेले 1 हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन मला देण्यात आले आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांची परिषदे देखील घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीवर राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कामांची सुरुवात आपण केलेली आहे

फडणवीसांनी विरोधकांना टोला लगवताना म्हटले की धुल चेहरे पे थी और वो आईना साफ करते रहे. संवाद हवा. मात्र, तो एकतर्फी असून चालत नाही.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Nana Patole-Devendra Fadnavis
Chitra Wagh : चित्रा वाघांनी दरेकर आणि लाडांचा ‘गेम’ केला अन् आंदोलनाचा ताबा घेतला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com