Kolhapur News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Black Magic: धक्कादायक! सरपंचांच्या शेतात जादूटोणा; सरपंचांनी होळी करत...

Rahul Gadkar

Kolhapur News: ग्रामपंचायत निवडणुकीतील ईर्ष्या, राग, द्वेष यातून तळंदगे येथील सरपंच संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी भानामती-करणीसारखा अघोरी प्रकार केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. मात्र, सरपंचांनी हार न मानता शक्कल लढवत भानामती करणाऱ्यांची अक्कल काढली. काळ्या बाहुल्या, लिंबू, मिरच्या, नारळ, हिरव्या रंगाचे ब्लाऊजचे कापड आदी साहित्य गोळा करत सरपंचांनी त्याचीच होळी करत अंधश्रध्दे विरोधात जनजागृती केली.

तळंदगे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक गतवर्षी डिसेंबरमध्ये झाली. निवडणुकीत सरपंचपदी संदीप पोळ विजयी झाले. पोळ यांच्या सरपंचपदाची वर्षपूर्ती काल गुरुवारी होत असतानाच बुधवारी (20 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेताच्या बांधावर सुया टोचलेले लिंबू, मिरच्या, नारळ, तीन काळ्या बाहुल्या, वस्त्र, खिळे आदी प्रकारचे साहित्य टाकल्याचे आढळून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरपंच (Sarpanch) पोळ यांनी करणीसारखा हा प्रकार बघून धीटपणे सामोरे जात शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी व इतरांना एकत्र करून त्यांच्या समोरच करणीचे साहित्य स्वतः जाळून टाकले. मानव मंगळावर जाण्याच्या तयारीत असताना लोक अजूनही भानामती-करणीसारख्या अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारात गुरफटले असल्याचा प्रत्यय येत आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT