Kolhapur Political News : आदित्य ठाकरेंप्रमाणे मुश्रीफांवर गुन्हा दाखल करा; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

Inauguration of Dharmaveer Sambhaji Maharaj Memorial : धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचे विनापरवानगी उद्घाटन केल्यावरून पालकमंत्री निशाण्यावर
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कोल्हापुरातील पापाची टिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असताना विनापरवानगी उद्घाटन केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या उद्घाटनाला महापालिकेची परवानगी नसताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य आमदार, अधिकारी यांनी उद्घाटन केले होते.

त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री, आमदार, अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक अपूर्ण असताना चुकीच्या पद्धतीने उद्‍घाटन केले.

Hasan Mushrif
Nitesh Rane On Land Jihad : नाशिकमध्ये 'लँड जिहाद' अन् भद्रकालीत ड्रग्ज... ; नितेश राणेंनी दिला अल्टिमेटम!

त्याबाबत सात दिवसांत महापालिकेने पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील (Satej Patil), ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, ठेकेदारावर यांचेवर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा कोल्हापूर (Kolhapur) बरोबरच कागलमधीलही विकासकामांची उद्‍घाटने केली जातील, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर महापालिकेला दिला.

याबाबत विविध हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कोल्हापूर महापालिकेला निवेदने देण्यात आली आहेत. उपायुक्त शिल्पा दरेकर यांना संघटनांनी या प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले आहे. निवेदनात म्हटले की, अनेक वर्षांपासून हिंदू समाज व संघटना स्मारकासाठी झटत आहेत. त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. पण राजकीय स्वार्थापोटी श्रेय लाटण्यासाठी काही नेत्यांनी उद्‍घाटन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्‍घाटन केले कसे? महापालिकेने गुन्हे दाखल का केले नाहीत? या बेकायदेशीर कार्यक्रमाला महापालिका (Municipality) अधिकारी व ठेकेदाराने साथ दिलीच कशी ? असे सवाल उपस्थित करत त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यासाठी गजानन तोडकर यांनी महापालिका प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याची सात दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत वरळीमध्ये जसे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याप्रमाणे येथे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आठव्या दिवसांपासून शहरातील व कागलमधील कामांची उद्‍घाटने हिंदू समाज करेल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

Hasan Mushrif
Sanjay Raut Vs Wadettiwar : राऊतांवर वडेट्टी'वार' ; म्हणाले, 23 जागांच्या वावड्या नको..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com