Kolhapur News, 31 Jan : हद्दवाढीच्या मुद्द्यावरून कोल्हापुकरांनी (Kolhapur) आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवसेंदिवस या मागणीचा जोर वाढत आहे. लोकप्रतिनिधींची भूमिका काय? असा सवाल कृती समितीकडून विचारला जात आहे. त्यावर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सध्या महायुतीचे सरकार आहे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजप आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी निशाणा साधला. महाडिक म्हणाले, कोणावर आरोप करण्यापेक्षा यामध्ये तोडगा निघालेला अधिक चांगलं. हद्दवाढ करण्याची जबाबदारी ही सर्वच लोकप्रतिनिधींची आहे. हद्दवाढची जबाबदारी कोणत्या पक्षावर ढकलणं योग्य नाही.अडीच वर्ष महाविकास आघाडीकडे देखील सत्ता होती. त्यावेळी त्यांनी का निर्णय घेतला नाही?
महायुतीचे (Mahayuti) सरकार आलं म्हणून ते निर्णय घेतीलच. पण महायुती सरकार शहराच्या जनतेला देखील न्याय देईल, आणि ग्रामीण भागातील जनतेला देखील न्याय देईल. यावर राज्याचे तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया अमल महाडिक यांनी दिली. शहराची हद्द वाढ करण्यासाठी शहरातील लोक सकारात्मक आहेत.
पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा विरोध आहे. कोल्हापूर शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, त्यासाठी एकत्र येऊन समन्वयाने निर्णय घेतला पाहिजे. ग्रामीण भागातील जनतेला आपण सुविधा देण्यास सक्षम आहे. हे महापालिकेने दाखवणे गरजेचे आहे. काही ग्रामपंचायती शहराला जोडूनच आहेत, या गावातील लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा निर्णय घ्यावा लागेल.
प्राधिकरणाच्या माध्यमातून शेजारील गावांना कोणताही टॅक्स न वाढलता सर्व सुविधा पाच ते सात वर्षे देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने शहराच्या हद्दीत बदल होतील, असं अमल महाडिक यांनी सांगितलं. माझा मतदारसंघ दोन्ही भागात आहे, शहराचा विकास करणे माझे कर्तव्य आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला देखील सुविधा देणे देखील माझे कर्तव्य आहे.
सर्वांना विचारात आणि विश्वासात घेऊन निर्णय घेणे योग्य राहील, त्यातून समज गैरसमज दूर होतील. प्राधिकरणासाठी निधी देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे, शहरी आणि ग्रामीण असा गैरसमज न करता दोन्ही बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.