Jitendea Awhad : "अशा खूप जखमा आहेत, पण..."; धनंजय मुंडेंच्या आडून आव्हाडांचा अजितदादांवर निशाणा, 'त्या' पोस्टमधून व्यक्त केली खदखद

Dhananjay Munde controversy : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळच आहे.
Ajit Pawar, Dhananjay Munde and Jitendra Awad
Ajit Pawar, Dhananjay Munde and Jitendra AwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 31 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळच आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मात्र, केवळ मागणी केली म्हणून राजीनामा घेता येत नाही. आरोपांमध्ये काही तथ्य असल्यास आणि ठोस पुरावे मिळेपर्यंत कोणाचा राजीनामा घेता येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) धनंजय मुंडेंची पाठराखण करत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत दिले.

अशातच गुरूवारी (ता.30) बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजितदादा परळीत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) देखील होते. याच सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धनंजय मुंडे हे नशीबवान असल्याचं म्हणत आपल्याबाबतीत अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याचा खुलासा केला आहे.

आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, धनंजय मुंडे हा माणूस नशीबवान आहे. सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे. 2019 मंत्री झालो पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली. मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे 3 आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत.

Ajit Pawar, Dhananjay Munde and Jitendra Awad
Ajit Pawar Warning : बीडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादांकडून कानउघाडणी; गुन्हेगारी प्रवृत्ती, कृत्यांना थारा देणार नसल्याचा भरला दम

पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदेसाहेब पालघर सोडत नाहीत. सत्य देवाला माहीत पण मी काही पालक मंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर..., अशा खूप जखमा आहेत. पण कधीच हिशोब दिला नाही की, मी हे केले मी ते केले.

2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहीला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघड पणानी दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लवायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन मीच करतो मीच करतो असे केले नाही. कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे, असं म्हणत आव्हाडांनी मुंडेंबाबात अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Ajit Pawar, Dhananjay Munde and Jitendra Awad
Ravindra Dhangekar : "माझा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून..."; शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण

तर या पोस्टमधून त्यांनी अजिक पवारांनी जाणूनबुजून त्यांना पालघरचं पालकमंत्रिपद दिलं नसल्याचा अप्रत्यक्षपणे दावा देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल अजित पवारांनी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना इशारा दिला होता.

मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही

ते म्हणाले, आता तुम्ही अपेक्षा करत असाल दादा आलाय तर काही काळजी नाही. पण ते डोक्यातून काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. कोणी खंडणी घेताना वगैरे आढळला तर त्याच्यावर मी मकोका लावायला देखील मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com