Kolhapur News, 10 Sep : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या हालचाली सुरू केले आहेत. महिनाभरापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराच्या हद्द वाढीची घोषणा केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोल्हापूर महानगरपालिकेकडे विवरणपत्रातील संपूर्ण माहिती व आढावा घेणारा अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार महानगरपालिकेकडून नगर विकास विभागाला ही माहिती तात्काळ पाठवण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे हद्दवाढीला वेग येणार आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षापासून कोल्हापूरवासीयांची आहे. परंतु या ना त्या कारणाने हद्दवाढीचा चा प्रश्न प्रलंबितच राहत होता.
आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार विवरणपत्र भरून देण्याच्या सूचना मंत्रालयातून महापालिकेला केल्या असल्याने ही माहिती भरून दिले आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. त्यासाठी हद्दी बाहेरील लोकांच्या अडीअडचणी १०० टक्के सोडविल्या जाणार आहेत.
त्यामुळे नगरविकास विभाग-१, नगर विकास विभाग-२ यांनी हद्दवाढीतील लोकांच्या अडचणी शासनाला कळवायच्या आहेत. हद्दवाढीच्या घोषणेची सद्यस्थिती काय आहे? यापूर्वी अंमलबजावणी झाली आहे का? नव्याने अंमलबजावणी करावयाची आहे का नाही, नवीन योजना तयार करावयाची आहे का? यासंदर्भातील सद्यस्थितीतील माहिती मागवण्यात आली आहे.
शिवाय हद्दवाढीसंदर्भात नवीन शासन निर्णय करावयाचा आहे का? विविध प्राधिकरणांची मान्यता, नवीन कायदा तयार करावयाची आवश्यकता आहे काय? हद्दवाढ करायची असल्यास, प्राधिकरणांची नावे व मान्यतेची सद्यस्थिती काय आहे?
केंद्र शासनाची मान्यतेची आवश्यकता आहे काय, मान्यतेची आवश्यकता असल्यास, मंत्रालयाचे नाव व मान्यतेची सद्यस्थिती, प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पीय तरतूदीची सद्यस्थिती, लेखाशिर्ष उपलब्धता निधीची माहिती. अर्थसंकल्पातील नविन बाब/पुरवणी मागणीची सद्यस्थिती काय आहे, मंत्रिमंडळ मान्यतेची आवश्यकता आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शासनाला कळवायची आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.