Nashik Kumbh Mela Roads : नाशिकच्या आयुक्तांना ठाकरेंच्या शिवसेनेचं थेट आव्हान; कुंभमेळ्याच्या रस्त्यांवरून पुन्हा वाद

Nashik Road Quality Row : महापालिकेची आगामी महासभा याच विषयावर गाजविण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका आयुक्त विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असे आरोप प्रत्यारोप गाजण्याची चिन्हे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने यापूर्वीही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Nashik Kumbh Mela | Road Quality Row
Nashik Kumbh Mela | Road Quality RowSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 10 Sep : नाशिक शहरातील रस्ते गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहेत. कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या कामावरून प्रशासनावर टीका होत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा येण्याआधीच गाजत आहे. शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि विकास कामांची घोषणा केली आहे.

२७ हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरातील कामांच्या गुणवत्तेवर ठाम विश्वास व्यक्त केला होता. महापालिकेच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आहे. यात दोष दाखवून दिल्यास नाव बदलेन असे आव्हान आयुक्त खत्री यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील कुंभमेळ्याच्या कामांचा दर्जा आणि कामकाज याविषयी त्यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आयुक्त खत्री यांना पुराव्यासह कामातील त्रुटी दाखवून देऊ असा दावा शिवसेना गटनेते केशव पोरजे यांनी केला आहे.

Nashik Kumbh Mela | Road Quality Row
Manoj Jarange Patil : अमृता फडणवीसांचं जेवणाचं निमंत्रण जरांगे पाटलांनी स्वीकारलं; कधी येणार दिवसही सांगितला...

महापालिकेची आगामी महासभा याच विषयावर गाजविण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका आयुक्त विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असे आरोप प्रत्यारोप गाजण्याची चिन्हे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने यापूर्वीही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कुंभमेळ्याच्या कामात ४० टक्के भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा देखील काढण्यात आला होता.

Nashik Kumbh Mela | Road Quality Row
Vidyanand Bapat Notice : विद्यानंद बापटांच्या अडचणीत वाढ; 48 तासांत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

आता महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या गुणवत्तेविषयी आत्मविश्वास व्यक्त केला होता. मुंबईच्या आयआयटी गुणवत्ता पथकाने या रस्त्यांची तपासणी केली. त्यात निवेदनामध्ये व्यक्त केलेल्या दाव्यांपेक्षा गुणवत्ता अधिक असल्याचे आढळले होते. याच पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी कामाच्या गुणवत्तेचा दावा केला होता. मात्र त्यावरून प्रशासन विरुद्ध ठाकरेंचा शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com