Kolhapur DCC Bank Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur: गोकुळच्या धुरळ्याआधीच केडीसीसीचा रणसंग्राम : दहा वर्षांच्या नियमामुळे नेत्यांमध्ये वारसदारांसाठी रस्सीखेच

Kolhapur DCC Bank Election, KDCC Election 2027, Kolhapur Cooperative Politics: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२७ निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ठराव प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. वारसदारांना संधी देण्यासाठी सहकारातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur DCC Bank Election: मागील दोन ते तीन महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या राजकारणामुळे महायुती मधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अंतर्गत राजकारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. गोकुळ निवडणुकीच्या चर्चा सुरु असताना आता कोल्हापूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचा राजकीय आखाडा निर्माण होणार आहे. कारण गोकुळ दूध संघाचे निवडणूक केव्हाही जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सहकार क्षेत्राचे राजकारण ढवळुण निघणार आहे.

केडीसीसी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची ठराव प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. केडीसीसी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ५ जानेवारी २०२७ रोजी संपत असून, त्यापूर्वी काही महिने आधी ठराव प्रक्रिया राबवावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिझर्व बँकेच्या नियमांनुसार दहा वर्षे संचालक असणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक संचालक आपल्या वारसदारांना या जिल्हा बँकेच्या रिंगणात आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे देखील एकमेकांचा काटा काढण्यासाठी नेते देखील सज्ज आहेत.

बँकेने नुकतेच संचालक मंडळाची मुदत संपत असल्याचे पत्र सहनिबंधक सहकारी संस्था यांना पाठवले असून, ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया राबविण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत संचालक पदाच्या २१ जागा होत्या. आगामी निवडणुकीत ही संख्या २५ होणार आहे.

आगामी निवडणुकीतील २५ जागांची विभागणी पुढीलप्रमाणे असेल:

कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील विकास संस्था गटात १२ जागा, साखर कारखाने, सूतगिरण्या, तालुका संघ गटात २ जागा, शेतीमाल प्रक्रिया, प्राथमिक यंत्रमाग संस्था गटात १ जागा, नागरी बँका, पतसंस्था गटात १ जागा, आणि दूध संस्था, वराह पालन संस्था शेळी-मेंढी संस्था गटात २ जागा असणार आहेत.

तसेच उर्वरित जागांमध्ये पाणीपुरवठा, ग्राहक, गृहनिर्माण, औद्योगिक आणि व्यक्ती सभासद गटात २ जागा, महिला राखीव २ जागा, अनुसूचित जाती-जमाती १ जागा, इतर मागासवर्गीय १ जागा, आणि विमुक्त भटक्या जाती-जमाती १ जागा अशा एकूण २५ जागा होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT