Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur: 'बॉस इज ऑलवेज नॉट राईट', अधिकाऱ्यांचा भांडाफोड करण्यासाठी अभियंत्याने भरले 5 लाख, तरीही....

Pradeep Pendhare

Kolhapur: 'बॉस इज ऑलवेज राईट' असे म्हटले जाते. आपल्या कर्मचारी सहकाऱ्यासोबत बॉसचे वर्तन चांगले आणि सहकार्याचे असले पाहिजे. पण कोल्हापुरात थेट सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या विभागाविरोधातच अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कागल उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातील कागदपत्रे उपलब्ध करणेसाठी शाखा अभियंत्याने 5 लाख 82 हजार भरलेत. तरीही अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

जिल्हापरिषदेच्या 25/15 अंतर्गत मूलभूत सोई सुविधा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची कुणकुण कागल उपविभाग शाखा अभियंता दीपक कुराडे यांना लागली होती. त्याअनुषंगाने कुराडे यांनी 2019 ते 24 पर्यंत मंजूर कामे आणि देयक अदा पर्यंत माहिती अधिकारातून माहिती मागितली आहे. संबंधित कागदपत्रांची संख्या २ लाख ६३ हजार २४१ इतकी असल्याने यांच्याकडे कागदपत्र उपलब्धतेसाठी तब्बल ५ लाख ८२ हजार ६५६ रुपये इतके भरून घेतले. मात्र 22 दिवसांच्या अवधीनंतर कुराडे यांना पैसे भरलेले चलन मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान चलन भरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्वांची कागदपत्रे मोजण्यास केवळ एक दिवसाचा अवधी लागला. पहिल्या टप्प्यातील माहिती देण्यास दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी कुराडे यांना अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा कार्यकारी अभियंता संजय पाटील आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुराडे यांनी केला आहे.

या संपूर्ण यंत्रणेत भ्रष्टाचार असल्याचा ठाम विश्वास कुराडे यांना असून, संबंधित माहिती लवकर मिळावी अशी मागणी कुराडे यांनी केली आहे. दरम्यान आपल्याच बॉसच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरच त्यांनी अन्नत्याग आंदोलन करायला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT