कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने राज्यातील दमदार नेत्यांकडे आगामी महापालिकांची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला असून कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेची सूत्रे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यावर सोपवण्यात आली. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर समिती बैठकीत आज हा निर्णय झाला. यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीत महाडिक यांचा सामना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीशी होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर हा मूळ जिल्हा असल्याने भाजपला येथे चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. त्यासााठी पाटील यांनी निष्ठावंताऐवजी महाडिक यांच्या नावास पसंती दिली.
मुंबईत झालेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मनगुंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आदी उपस्थित होते.
माजी खासदार महाडिक हे राष्ट्रवादीचे पाच वर्षे खासदार होते. त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक १८ वर्षे विधान परिषद आमदार तर चुलत भाऊ अमल दक्षिणचे आमदार होते. महादेवराव महाडिक यांनी २० वर्षांहून अधिक काळ महापालिकेतील राजकारणाचे नेतृत्व केले. महाडिक व त्यांच्या गटाला मानणारा मोठा वर्ग शहर व परिसरात आहे. त्यामुळेच महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपची जबाबदारी महाडिक यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेच्या राजकारणात महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी कार्यरत होती. धनंजय महाडिक यांनी स्थापन केलेल्या धनंजय महाडिक युवाशक्तीचेही मोठे संघटन शहर व जिल्ह्यात आहे. त्याचा फायदा भाजपला व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पक्षातील निष्ठावंताऐवजी महाडिक यांच्यावर ही जबाबदारी दिल्याचे बोलले जाते.
अन्य शहरातील जबाबदारी
मुंबई-आशिष शेलार, ठाणे-निरंजन डावखरे, नागूपर-सुधीर मनगुंटीवर, उल्हासनगर-कुमार ऐलानी, सोलापूर-विजय देशमुख, पुणे-राजेश पांडे, चंद्रपूर-चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी- माधुरी मिसाळ, नाशिक-गिरीश महाजन, जयकुमार रावल, औरंगाबाद-केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, लातूर-संभाजी पाटील-निलंगेकर, अकोला-रणधीर सावरकर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.