देवेंद्र फडणवीसांची पाठ फिरताच भाजप ४ नगरसेवक शिवसेनेत!

देवेंद्र फडणवीसांनी नाशिक सोडताच ४ नगरसेवकांचा भाजपला जय महाराष्ट्र!
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नाशिक : काही दिवसांपूर्वीच शहरात (NMC) महापालिका निवडणुकीचा बिगूल फुंकणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शिवसेनेने राजकीय शॅाक दिला आहे. भाजपचे (BJP) चार नगरसेवक आज सायंकाळी पाचला मुंबईत शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या राजकीय चढाचोढ तीव्र झाली आहे. शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी आजचा कार्यक्रम घडवून आणला आहे.

Sanjay Raut
मराठा आमदार, मंत्र्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे अन्यथा राजीनामे द्यावेत!

आज सायंकाळी सह्याद्री विश्रामगृहावर सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या प्रवेश कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, विशाल संगमनेरे, हेमलता कांडेकर, मनीष बागूल, अपक्ष सय्यद मुशीर आणि अन्य अशा पाच नगरसेवकांचा त्यात समावेष आहे. आज सकाळी अचानक या बातमीने भाजपला धक्का बसला आहे.

Hemlata Bidkar submits resignation to Commissioner
Hemlata Bidkar submits resignation to CommissionerSarkarnama

यामध्ये एका नगरसेवकाचा शिवसेनेचा प्रवेश अपेक्षित होता, मात्र एका एैवजी पाच नगरसेवकांचा प्रवेश होत असून त्यात भाजपच्या चार जणांचा समावेष आहे. यामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतलेले सय्यद मुशीर यांनी देखील बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sanjay Raut
`राष्ट्रवादी`ची मागणी कृषीमंत्री दादा भुसे मान्य करतील का?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत पाच वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने मनसेच्या अनेक नगरसेवकांच्या रोज भाजपमध्ये प्रवेशाच्या बातम्या येत होत्या. राज्यात सत्ते असल्याने व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सत्ता, राजकीय डावपेच व साधनांचा उपयोग यातून हे घडले होते. त्याच सुमारास जिल्हाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर इडीची कारवाई झाल्याने भाजपला मोकळं रान मिळाले होते. यंदा परिस्थिती बदलल्याने महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपची सध्या बचावात्मक स्थिती आहे. याची जाणवी असल्याने चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेनेवर टिकेची झोड उठवली होती. भाजप पुन्हा एकदा महापालिकेत सत्तेत येईल, असा दावा करून प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. प्रत्यक्षात त्यांची पाठ फिरताच नगरसेवकांच चलबिचल झाल्याचे लपुन राहिलेले नाही.

दरम्यान आज सकाळी नगरसेविका कांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपुर्त केला. त्यावर भाजपकडून काहीही प्रतिक्रीया आली नाही. शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीत चांगलीच कंबर कसली आहे. गेले अेक दिवस जोमाने तयारी करीत असताना त्यांनी महानगरप्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. त्यांनी शहरात प्रभाग रचनेपासून तर संघटनात्मक तयारीत लक्ष घातले आहे. माजी महापौर वसंत गिते, महानगरप्रमुख बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड यांचे पॅनेल तयार केले होते. त्यात नुकतीच नगरसेवक विलास गिते, माजी महापौर विनायक पांडे यांची भर पडली आहे. याशिवाय सुनिल बागूल यांना उपनेतेपदी बढती देण्यात आली आहे. ग्राऊंड लेव्हलवर शिवसेनेची ही तयारी व त्यावर संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी त्यात समन्वयकाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येईल तशी भाजपची चलबिचल वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची प्रचिती येऊ लागली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com