Kolhapur famous college harassment scandal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Harassment Case : कोल्हापूर हादरलं! नामांकित कॉलेजमधील प्राध्यपक निघाला नराधम; एकीमुळे तब्बल 12 जणींची विनयभंगाची तक्रार

Kolhapur college professor molestation allegations: कोल्हापूरमध्ये 12 विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर प्राध्यापकाला अटक; छेडछाडीचा धक्कादायक प्रकार.

Rahul Gadkar

Kolhapur professor accused by multiple women: कोल्हापुरातील शहराच्या नावावरून असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलून त्यांच्याशी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या प्राध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका मुलींने संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात तक्रार केल्याचे धाडस केल्याने गेल्या चार दिवसात तब्बल बारा मुलींनी प्राध्यापक सौरभ जोशी यांच्या विरोधात गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर अटक करून न्यायालयात कोठडीत असलेल्या सौरभ जोशीचा पुढील तपासासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे आणखी किती मुलींशी सौरभने लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सौरभ जोशी संबंधित कॉलेजमध्ये कार्यरत आहे. तो महविद्यालयातील विद्यार्थिनींना वारंवार केबिनमध्ये बोलावून घ्यायचा. तसेच फोनवरून त्यांना मॅसेज करून भेटण्यासाठी बोलावत होता. तक्रारदार विद्यार्थिनीलाही त्याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत वेळोवेळी फोन, मॅसेज केले. तिला केबिनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याने तिला धक्काच बसला. याबाबत तिने थेट पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. मध्यरा‍त्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित न्यायालयात कोठडीत असताना सोमवारी पुन्हा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गोकुळ शिरगाव परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रा. जोशीला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी सात विद्यार्थ्यांनी तक्रार दिली होती.

तर रविवारी आणखी पाच मुलींनी जोशीच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल झाल्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी न्यायालयाकडे पुन्हा अर्ज दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीतून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयीन कोठडीत गेलेल्या जोशीचा ताबा पोलिसांना आज पुन्हा मिळाला. त्याची आता पोलिस कोठडीत चौकशी होणार आहे. यातून अधिक पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे.

विद्यार्थिनींना वारंवार फोन आणि मेसेज करून केबिनमध्ये एकांतात बोलवून विनयभंग केल्याप्रकरणी प्रा. जोशीवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वीच न्यायालयात हजर केले होते. तेंव्हा त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

मात्र त्याच्याविरोधात १२ विद्यार्थिनींनी तक्रार अर्ज दिल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते. त्याची चौकशी करण्यासाठी पुन्हा ताबा मिळावा, अशी मागणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केली. न्यायालयीन कोठडीदरम्यान जोशी कळंबा मध्यवर्ती कारागृहात होता. तेथून पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. त्याच्या घराचीही झडती घेतली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास संशयित ठिकाणीही त्याला घेऊन जाण्याची शक्यता आहे.

प्रा. जोशीने केलेल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, तक्रारी वाढल्यामुळे त्याचा पुन्‍हा ताबा घेतला आहे. आता तो पोलिस कोठडीत आहे. संबंधित साक्षीदारांनी पुढे आल्यास त्याच्या विरोधात आणखी भक्कम पुरावे तयार होतील. त्यामुळे साक्षीदारांनी पुढे यावे, पोलिसांना सहकार्य करावे. अशी माहिती सुजितकुमार क्षीरसागर, पोलिस उपअधीक्षक, करवीर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT