Ichalkaranji Municipal Corporation approved the ₹22 crore garbage collection tender during a two-minute special meeting amid opposition boycott and political protests. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Flood : कोल्हापूर-सांगलीतील पुराचा कहर थांबणार? 3200 कोटींच्या प्रकल्पाला वेग; फडणवीसांची मोठी घोषणा

Kolhapur Flood Control, Sangli Flood Project, Maharashtra Resilience Program: कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीसाठी ₹३२०० कोटींचा महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम मार्गी. जागतिक बँकेच्या सहकार्याने पूरनियंत्रण, नदी वहनक्षमता आणि जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Flood Control: दरवर्षी पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या महापुराच्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

या समस्येची दखल घेत मागील वर्षी जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दोन्ही जिल्ह्यांमधील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली होती. या पाहणीनंतरच्या प्रक्रियेला गती देत, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' हॅण्डलवरून या प्रकल्पाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेने संयुक्तपणे राबवलेल्या 'महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' (MRDP) अंतर्गत आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आणि प्रशासकीय प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाद्वारे कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या शहरांसाठी एक प्रभावी दीर्घकालीन पूरनियंत्रण व्यवस्था उभी राहणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत सुधारणा केली जाईल. तसेच, पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढवणे आणि शहरांमधील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा अधिक आधुनिक व सक्षम करणे यांसारख्या सर्वंकष उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्याला केंद्र सरकारकडून मोलाचे सहकार्य मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. तसेच, भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाचे आणि जागतिक बँकेचे आभार मानत या प्रकल्पाची अंमलबजावणी आता आणखी जलद गतीने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT