Navi Mumbai: NEET, TET नंतर आणखी एक परीक्षा ऐनवेळी रद्द; 19 हजार उमेदवार संतप्त

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment:नवी मुंबई महापालिकेची 132 पदांची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द. 19,220 उमेदवारांवर परिणाम; स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी नवीन भरती नियम लागू करण्याची तयारी.
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment:
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment:
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील १३२ पदांच्या भरतीसाठी आज ( २१ जुलै) होणारी ऑनलाइन परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. परीक्षेला अवघे २४ तास शिल्लक असताना महापालिकेच्या महासभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरभरतीमध्ये प्राधान्य मिळावे, यासाठी नवीन सेवा भरती नियम तयार करण्यात यावेत, या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो उमेदवारांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी भरती परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. नवी मुंबईतील स्थानिक युवक, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील उमेदवारांना नोकरीत योग्य प्रतिनिधित्व आणि प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. त्यासाठी विद्यमान भरती प्रक्रिया थांबवून नव्याने सेवा भरती नियमावली तयार करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रस्तावाला विरोधी पक्षातील सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

महासभेदरम्यान परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांकडून न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते, अशी शक्यता काही सदस्यांनी व्यक्त केली. तरीही स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाला प्राधान्य देत लोकप्रतिनिधींनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली. नव्या भरती नियमांनुसार स्थानिकांना अधिक प्राधान्य देऊन भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी भूमिका सभागृहात मांडण्यात आली.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment:
Anganwadi Workers News: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा! 45 वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती

नवी मुंबई महानगरपालिकेतील १३२ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरतीसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल १९,२२० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नियोजनानुसार २१ जुलै रोजी सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती. उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यात आले होते. परीक्षा केंद्रांची तयारी पूर्ण झाली होती आणि परीक्षेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती.

मात्र, परीक्षा होण्याच्या अवघ्या एका दिवस आधी ती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी प्रवासासाठी रेल्वे व बसची तिकिटे आरक्षित केली होती, तर काही उमेदवार परीक्षा केंद्रांच्या शहरात पोहोचलेही होते. निवास, प्रवास आणि इतर खर्च करून परीक्षेची तयारी केलेल्या उमेदवारांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेची तारीख इतक्या उशिरा रद्द करण्याऐवजी हा निर्णय यापूर्वी घेता आला असता, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment:
CJP Parliament March: कंगना रणौत यांचा CJP आंदोलनावर हल्लाबोल; 'सरकार चालवायचं असेल तर निवडणूक लढा'

दरम्यान, आता नवीन सेवा भरती नियम तयार झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया नव्याने राबविली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आणि पुढील वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ हजारांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेत अडकले असून, या प्रकरणाचे पुढील पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com