Kolhapur flood situation Satej Patil met Karnataka Chief Minister Siddaramaiah Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक; थेट मुख्यमंत्र्यांपुढे ठाण मांडले...

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 2019 आणि 2021 च्या महापुराचा फटका करवीर, शिरोळ तालुक्याला बसला होता. त्यामुळे धास्ती कोल्हापूरकरांनी यापूर्वी घेतली आहे. या संपूर्ण महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार आहे. असा आरोप अनेक संघटनांकडून करण्यात आला होता. यंदा देखील महापूराची धास्ती कायम असून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली परिसराला महापुराचा धोका उद्भवू नये यासाठी काँग्रेसचे (Congress) आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे.

सध्या पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली या गावाला पुराचा सर्वाधिक धोका असतो. त्यानंतर शहरात देखील पुराचे पाणी काही भागात शिरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जिल्हा प्रशासन सर्वोत्तम सज्ज असले तरी कर्नाटकातील (Karnataka) अलमट्टी धरणामुळे महापुराचा पुन्हा धोका उद्भवू शकतो.

या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर स्थिती नियंत्रणात ठेवावी. अशी मागणी डि के शिवकुमार यांच्याकडे केली आहे.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व नामदार एच. के. पाटील हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि डी के शिवकुमार यांनी कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगलीमध्ये महापुराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी सूचना दिली आहे.

याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत, असेही ते म्हणाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT