Chetan Narake : चेतन नरके उतरले पुराच्या पाण्यात; मंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Chetan Narake Radhakrishna Vikhe patil Ajit Pawar : डॉ.चेतन नरके यांनी पन्हाळा तालुक्यातील काजवडे, पोर्ले, तांदुळवाडी, धामणी खोरा, साळवाडी, बाजारभोगाव आदी परिसरातील दूध उत्पादकांना भेट देवून अडचणी जाणून घेतल्या.
Chetan Narake
Chetan Narakesarkarnama
Published on
Updated on

Chetan Narake News : कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूरसदृष्य स्थिती आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत. दळणवळण यंत्रणा कोलमडल्याने दूध वाहतुकीवरही परिणाम झाल्याने रोज सरासरी 25 हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे.

सततचा पाऊस, थंड वातावरण आणि चाऱ्याचा अभाव अशा विपरीत नैसर्गिक परिस्थितीमुळे दूध उत्पादनही घटले आहे. ही परिस्थिती पाहून 'गोकुळ'चे संचालक चेतन नरके यांनी पुराच्या पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नैसर्गिक आपत्ती गृहीत धरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.

पंचगंगा नदी परिसरासह जिल्ह्यातील सर्वच नद्यांने पाणी पात्राबाहेर आले आहे. अनेक बंधाऱ्यासह रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मार्ग बंद झाले आहे. दुधाची हक्काची बाजारपेठ गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दळणवळण यंत्रणा कोलमडल्याने रोज सरासरी 25 हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ.चेतन नरके यांनी पन्हाळा तालुक्यातील काजवडे, पोर्ले, तांदुळवाडी, धामणी खोरा, साळवाडी, बाजारभोगाव आदी परिसरातील दूध उत्पादकांना भेट देवून अडचणी जाणून घेतल्या.

Chetan Narake
Raghunath Dada Patil on Raju Shetti 'स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी चळवळीचा घात केला' ; राजू शेट्टींवर रघुनाथदादांचा हल्लाबोल!

मागील आठ दिवसांसह पुढील महापुराच्या दिवसांची सरासरी काढून पूरबाधित क्षेत्रातील दूध उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे-पाटील यांना ई मेल केले. तसेच फोनवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विखे-पाटील यांच्याशी संपर्क करुन शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली.

राज्य सरकार दुग्ध उत्पादकांच्या पाठीशी राहील, नुकसान भरपाईबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दोन्ही मंत्री महोदयांनी दिल्याचे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले आहे.

(Edited By Roshan More)

Chetan Narake
Rahul Gandhi : अमित शाह यांच्यावरील टिप्पणी राहुल गांधींना भोवणार; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com