Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News: पुढच्या वेळी खासदार होऊनच या! 'बाप्पा'समोर शाहू छत्रपतींनी दिल्या राजू शेट्टींना शुभेच्छा...

Mangesh Mahale

-राहुल गडकर

Kolhapur Political News: कोल्हापूर शहरातील यंदाचा गणेशोत्सव राजकीय टीका टिप्पणीने चांगलाच गाजला. ठाकरे गट-शिंदे यांच्यात झालेल्या राजकीय स्टंटबाजीमुळे कोल्हापुरातील वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. राजकीय फायद्यासाठी आता 'बाप्पा'लाही या नेत्यांनी सोडलेलं दिसत नाही, असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखील तेच केले, अशी भावना गणेशभक्तांची झाली. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या वतीने रविवारी देखाव्याचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका टिप्पणी केली.

"राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांना उसाला दर चांगला मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धडपडणारा प्रतिनिधी आहे. पुढच्या वेळी खासदार होऊनच या," अशा शुभेच्छा शाहू छत्रपती यांनी शेट्टींना दिल्या.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू देत नव्हते, पण आत्ताचे राज्यकर्ते महाराजांचे नाव घेऊन जनतेला लुटा; पण आमचा वाटा टाका असे म्हणतात," अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. "कारखानदार व त्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकार घेते," अशी टीका शेट्टी यांनी केली. या वेळी उद्योजक नितीन दलवाई, कविता पोवार, सरदार पार्टील यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उत्सव प्रमुख केदार सूर्यवंशी, अनिल ढवण, अजित पोवार आदी उपस्थित होते.

राजकारण करू नका...

कोल्हापुरातील यंदाचा गणेशोत्सव राजकीय टीका टिप्पणीत पार पडत आहे. संयुक्त छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीवरून कोल्हापुरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगला आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देवाच्या दारातही दोन गटांनी राजकारण केल्यानंतर गणेशभक्त यांच्यात नाराजी आहे. किमान उत्सव काळात लोकप्रतिनिधींनी राजकारण करू नये, अशी अपेक्षा जनतेची आहे. मात्र, त्यालाही प्रतिनिधी बेदखल करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काल देखव्याच्या उद्घाटन प्रसंगी शेट्टी यांनी केलेली टीका टिप्पणी त्याला अपवाद ठरली.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT