Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील दोन मोठ्या संस्थांचे सप्टेंबरमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. गोकुळची अंतिम मतदार यादी ५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तर जिल्ह्याची बँक समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या अंतिम मतदार यादीनंतर पक्षीय राजकारणाला वेगळेच वळण लागणार आहे. शिवाय महायुतीमधील अंतर्गत वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. आतापासूनच प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती पाहता महायुतीतील संघर्ष अटळ आहे.
सत्तेतील, पण सध्या एकटे असलेले आमदार सतेज पाटील यांनी २५ जागा लढविणार असल्याचे सांगून राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावाची प्रक्रिया सुरू आहे. याचवेळी अनेक अडथळे पार करून गोकुळची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आजपर्यंत मतदार निश्चित नसल्यामुळे संचालक आणि नेत्यांनीही शांततेत घेतले होते. आता मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून एकत्रित प्रचार सुरू केला आहे.
मात्र, त्याला अद्याप गती नाही. केवळ संपर्क दौरे सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील यापूर्वी आमदार पाटील यांच्याकडे होते. आता ते त्यांच्या विरोधी गटात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरेही पाटील यांच्या विरोधात आहेत.
त्यामुळे निवडणुकीचे वातावरण वेगळे असणार आहे. शेतकरी पॅनेल आणि नेत्यांचे पॅनेल असे दोन भाग दिसणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीची रंगत दिसायला सुरुवात होणार आहे.
पक्षांचे संपर्क दौरे सुरू दूध उत्पादक कोणाच्या बाजूने उभे राहणार, हे प्रचाराच्या मुहूर्तानंतरच स्पष्ट होणार आहे. भाजपचे स्वतंत्र दौरे सुरू आहेत. टोकण आणि इतर बाबींचा विचार करता महायुती म्हणून सर्व नेते एकत्रित असणार आहेत. महायुतीतील अन्य पक्षांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत.
आमदार सतेज पाटील गटाकडून अंतर्गत प्रचार सुरू आमदार पाटील यांच्या गटाकडून अंतर्गत प्रचार सुरू आहे. पॅनेलमध्ये कोण पंचवीस उमेदवार असणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांनी अंतर्गत प्रचार सुरू केल्याचे सांगण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.