Gokul Election : गोकुळमध्ये मोठी राजकीय घडामोड : भाजप आमदारांसह अदृश्य शक्तींना हायकोर्टाचा झटका; मुश्रीफ-कोरेंच्या मनासारखं घडलं!

Gokul Election : कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अवसायनातील 1320 संस्थांना मतदानाचा अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि शिवसेना नेत्यांना मोठा दिलासा मिळाला.
Gokul Dudhsang 2026
Gokul Dudhsang 2026Sarkarnama
Published on
Updated on

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार असल्याचा निकाल कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला मोठा धक्का बसला असून, अवसायनातील 1320 संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गोकुळमधील अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळू नये, यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून राजकीय पातळीवर संघर्ष सुरू होता. या लढाईत भाजपच्या काही आमदारांसह एका ‘अदृश्य शक्ती’चीही चर्चा होती. मात्र, सर्किट बेंचच्या निर्णयामुळे अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Gokul Dudhsang 2026
Gokul Election: गोकुळच्या राजकारणात मोठी घडामोड! अदृश्य शक्तीला सुप्रीम कोर्टाचा धक्का; निवडणूक 60 दिवसांत घेण्याचे आदेश

या निर्णयामुळे गोकुळचे माजी संचालक तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे आणि शिवसेनेच्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अवसायनातील संस्थांच्या मतदानाच्या अधिकारासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे.

193 संस्थांच्या प्रकरणातून इतरांनाही फायदा?

सध्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर अवसायनातील 193 संस्थांच्या मतदानाच्या अधिकारासंदर्भात सुनावणी झाली. या संस्थांच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता उर्वरित अवसायनातील संस्थांच्या बाबतीतही संबंधित उपनिबंधकांना याच धर्तीवर निर्णय घ्यावा लागू शकतो.

त्यामुळे सर्किट बेंचकडे धाव घेतलेल्या 193 संस्थांच्या निर्णयाचा थेट फायदा इतर अवसायनातील संस्थांनाही होण्याची शक्यता आहे. परिणामी, अवसायनातील सर्व 1320 संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gokul Dudhsang 2026
Gokul Milk Union: गोकुळची निवडणूक लांबवण्यामागे कोण होतं?; न्यायालयाच्या एका आदेशाने उधळलं 'अदृश्य शक्तींचं' राजकीय गणित

गोकुळच्या राजकारणावर परिणाम होणार?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या संस्थांची संख्या आणि त्यांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास त्याचा परिणाम गोकुळच्या आगामी राजकीय समीकरणांवर होऊ शकतो.

सर्किट बेंचच्या या निर्णयानंतर आता उपनिबंधकांकडून उर्वरित अवसायनातील संस्थांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे गोकुळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात कोणाची बाजू वरचढ ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com