Shashikant Patil Chuyekar as the new chairman of Gokul Dairy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरून महायुतीत ठिणगी; मुश्रीफ, पाटलांचा गनिमी कावा...

Political Rift in Mahayuti Over Gokul Presidency : गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : गोकुळमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर अध्यक्षपदाच्या नावावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे नेते आणि आमदार विनय कोरे यांच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे. पण नेत्यांनी सावध पवित्रा घेत अध्यक्षपदाचे नाव जाहीर केलेले नाही.

गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील प्रमुख नेत्यांनी बैठकीला पाठ फिरवल्याने अध्यक्ष पदाचा संस्पेंस कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत बंद लिफाफ्यात अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव जाणार? याची उत्सुकता गोकुळच्या राजकारणात लागून राहिली आहे.

अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे आणि माजी आमदार संजय घाटगे यांची बैठक पार पडली. बंद खोलीत झालेल्या चर्चेत कोणही संचालक उपस्थित नव्हते. जवळपास दीड तासांच्या चर्चेनंतर कोरे हे बैठकीतून निघून गेले. तर मंत्री मुश्रीफ आणि पाटील यांनी शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बंद लिफाफ्यात अध्यक्षपदाचे नाव देण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, अध्यक्षपदाचे नाव निवडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात होते. या बैठकीला ते आले नाहीत. शिवाय माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, ए वाय पाटील, आमदार चंद्रदीप नरके हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत अध्यक्ष अरुण डोंगळे आणि मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे देखील या बैठकीला अनुपस्थित होते. एकंदरीतच पाहता गोकुळच्या राजकारणात संचालक मंडळाच्या बैठकीत बंद पाकिटातून कोणाचे नाव समोर येणार? याची उत्सुकता गोकुळच्या राजकारणात लागून राहिली आहे.

शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी महायुतीच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ का फिरवली? याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी गोकुळच्या राजकारणात भूकंप होणार की त्यांनी पसंत केलेल्या नावाला सहमती देणार? याकडे देखील संचालक मंडळासह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT