Hasan Mushrif: आधी विरोध, नंतर समर्थन; शक्तिपीठ महामार्गबाबत मुश्रीफांची बदलती भूमिका; आता काय म्हणाले?

Shaktipith Highway Hasan Mushrif statement new alignment plan: शेतकऱ्यांचा विरोध होता, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून रद्द केला. त्यानंतर काही शेतकरी येऊन शक्तीपीठ महामार्ग करावा. त्यातून बागायती क्षेत्र वगळावे अशी मागणी करत होते.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. विधानसभा निवडणुकीत थेट कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला, असा आदेश घेऊन प्रचारात उडी घेतली. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महिनाभरातच मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग बद्दलची मवाळ भूमिका घेतली.

तीन टप्प्यांवरील भूमिका स्पष्ट दिसत असताना आता मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःच शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातूनच जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बागायती क्षेत्र वगळून या महामार्गासाठी नवी अलाइनमेंट करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुश्रीफ म्हणाले, "जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून रद्द केला. त्यानंतर काही शेतकरी येऊन शक्तीपीठ महामार्ग करावा. त्यातून बागायती क्षेत्र वगळावे अशी मागणी करत होते. अनेक शेतकरी चार ते पाचपट मोबदला द्या, अशी मागणी देखील करत आहेत.

त्यासाठी आम्ही तयार असल्याचे देखील सांगत होते. त्यामुळे या महामार्ग क्षेत्रातून बागायती क्षेत्र कसे वगळता येईल, त्यातून शेतकऱ्यांची कमीत कमी नुकसान होईल आणि त्यांना अधिक मोबदला कसा देता येईल याचा प्रयत्न राहणार असल्याचा मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif
Panchkula News: धक्कादायक: पंचकूला येथे एकाच परिवारातील 7 जणांनी जीवन संपवलं! दिल्लीतील बुराडी मृत्यू प्रकरणाची आठवण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात काही करणार नाही. अशी भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केली आहे. ज्यांचा विरोध आहे. त्यांना वेळ वगळून हा महामार्ग कसा पुढे नेता येईल व कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने नवीन अलाइनमेंट तयार केली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com