Kolhapur Political News: गावचा पुढारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केली होती. मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायत तील आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंगले आहे. तर अनेकांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत पार पडल्यानंतर 'कही खुशी कही गम' असे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र होते. रात्री उशिरा सरपंच सोडत पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतीपैकी 514 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. दरम्यान आरक्षण सोडतीच्या दरम्यान ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी तालुकास्तरावर सोडतीच्या ठिकाणी गर्दी केली होती. सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निम्मी निवडणूक जिंकल्याचाच अविर्भावात केंद्रावर जल्लोष साजरा केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार 26 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदासाठी आज तालुकास्तरावर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दुपारी तीन वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरा संपली.
सोडतीकडे सरपंच होऊ पाहणाऱ्या पुढाऱ्यांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. शिवाय सरपंच पदासाठी इच्छुकांची घालमेल देखील दिवसभर पाहायला मिळाली. गावागावातील राजकीय गट त्यानिमित्ताने आमने-सामने आले होते.
आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे ,यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापैकी चार महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील मानवाड, करवीर तालुक्यातील सांगवडे, शिरोळमधील टाकळीवाडी हे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव, शिरोळमधील आगर, गडहिंग्लज मधील कडलगे, चंदगडमधील मिरवेल गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
दरम्यान काही ठिकाणी या आरक्षण पद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढल्याचा आरोप परत प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे काही तालुकास्तरांवर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे तक्रार करणाऱ्या संबंधितांना आरक्षण पद्धतीची प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र ज्यांची निरसन झाले नाही, अशांनी लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.