Kolhapur Panchayat Scam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Scam : ग्रामपंचायतीच्या बिलात दहा लाखांचा घोटाळा; महिला सरपंचासह संपूर्ण बॉडी बरखास्त होण्याची शक्यता

Gram Panchayat Solar Project Scam in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील सौरऊर्जा प्रकल्पात नऊ लाख 84 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती ग्रामस्थ कृष्णात भीमराव पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे 26 जुलै 2024 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.

Rahul Gadkar

kolhapur News, 16 Apr : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील सौरऊर्जा प्रकल्पात नऊ लाख 84 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती ग्रामस्थ कृष्णात भीमराव पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे 26 जुलै 2024 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.

त्यावर पंचायत समिती पन्हाळ्याचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे यांनी चौकशी केल्यानंतर कृष्णत पाटील यांच्या तक्रारीत तथ्य आढळले. दरम्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासात जवळपास दहा लाखांचा घोटाळा सिद्ध झाल्याने कोणत्याही क्षणी भादोले गावच्या सरपंचासह 18 सदस्यांची बॉडी रद्द होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 नुसार व पात्र ठरवण्याची कारवाई करण्यात यावी, असा अभिप्राय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. विभागीय आयुक्तांकडून त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात जनसुराज्यचे नेते आणि आमदार विनय कोरे यांच्या गटाचे 13 सदस्य आणि सरपंच नेहा पाटील यांचा समावेश आहे. जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालानुसार कारवाई झाली तर जनसुराज्य शक्तीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवाय काँग्रेसच्या पाच सदस्यांचा देखील यामध्ये समावे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर सरपंच नेहा पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसीवर खुलासा घेण्यात आला होता. मात्र या नोटीसमधून सत्यता स्पष्ट होत नसल्याने अमान्य करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यानुसार जो अहवाल दिला त्यात गंभीर कारभाराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोलर पॅनलची जोडणी पूर्ण नसणे, पॅनल कनेक्ट पिन व्यवस्थित जोडण्यात आल्या नाहीत. अर्थिंग केलेले नाही. शिवाय लाइटिंग कंडक्टर बसवण्यात आला नसल्याच्या गोष्टी लक्षात आल्या. या सर्व साहित्यांची किंमत पाच लाख 95 हजार रुपयांची असल्याचे उघड झाले.

मात्र ग्रामपंचायतकडून ठेकेदाराला 15 लाख 80 हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. मूल्यांकनपेक्षा 9 लाख 84 हजार जादा अदा केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल हातकणंगले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनीही दिला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारात कसूर झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र मगदूम यांची देखील खातेनीय विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

दरम्यान घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवकाने संबंधित ठेकेदाराकडून नऊ लाख 84 हजार 207 रुपये रक्कम पुन्हा भरून घेतले. झालेला हा प्रकार चूक कबूल केल्यासारखा केल्याने कोणत्याही आर्थिक नुकसान झाले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न या सरपंचासह सदस्यांनी केल्याचं समोर आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT