Kolhapur News:कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि माजी पालकमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची मैत्री राजकारणाच्या पलीकडे आहे.
मुश्रीफ सध्या महायुतीचे नेते, पाटील हे महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून तयार होते आणि आहेत. मात्र सहकारातील दोस्ती कायम असल्याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सतेज पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या स्टेजवरून पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर बोलणे टाळले आहे. त्याची चर्चा पुन्हा एकदा जिल्ह्यात सुरू झाली आहे. खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडी कार्यक्रमात महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता थेट टीका केली होती.
'गोकुळ' त्यांच्या ताब्यात आहे. गोकुळमध्ये व्हेटरनरी कॉलेज करण्याचा मानस आहे. ते कॉलेज करण्यास विरोध नाही. पण खाजगीकरणास विरोध आहे. त्याचा ठराव पास झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. खाजगी म्हणजे डी.वाय.पाटील ग्रुपलाच हे जाणार आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. पालकमंत्री तुम्ही हे होऊ देऊ नका. राजकारणाचा धंदा करणाऱ्या या चेहऱ्याला कोल्हापूरकरांनी ओळखलं पाहिजे, असेही महाडिक म्हणाले होते.
हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या विधानावर थेट बोलणे टाळले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय महाडिक यांनी महायुतीची पहिली सभा दहीहंडीच्या कार्यक्रमात घेतली आहे.
भाजपमध्ये प्रचार यंत्रणा कशी असावी? हे भाजपमध्ये नव्या आलेल्या लोकांना चांगलेच कळले आहे. धनंजय महाडिक यांनी अनेक गोष्टी सविस्तर सांगितल्या. मात्र काही गोष्टीवर मी सविस्तर बोलणार नाही. कारण महापालिका आणि गोकुळमध्ये मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे, असे सांगत त्यांनी त्या प्रकरणावर बोलणे टाळले. त्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आमदार झाल्यापासून जवळपास 17 वर्षे काँग्रेस सोबत सत्तेत आहेत. मात्र महायुतीत गेल्यानंतर त्यांना काँग्रेसची उन्नती दिसली नाही. त्याचा प्रत्यय काल आला. कारण याच स्टेजवरून मुश्रीफ यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. काँग्रेसची सत्ता असताना देखील इतकी देशाची उन्नती झाली नव्हती. इतकी उन्नती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर झाली, अशा शब्दात मुश्रीफ यांनी कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.