Hasan Mushrif Kolhapur village road Issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur news : "मुश्रीफसाहेब फोन करा अन् अधिकाऱ्यांवर कारवाई करायला सांगा"; रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीतून दवाखान्यात नेणाऱ्या नातवाची व्यथा

Hasan Mushrif Action : कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी येथील केले अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी संघर्ष सुरू आहे. पासून काही अंतरावर जवळपास 15 ते 20 घरांचं वास्तव आहे. पास 40 ते 50 मतदारसंघ असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 02 Jul : सेनापती कापसी येथील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केलेल्या शिक्षकावर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना संतापलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यानी मंत्रालयातून फोन करून पोलिसांना दिल्या आहेत.

त्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ चांगले काम केल्याचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात आले. मात्र, कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी येथील एक महत्वाची वेगळीच गोष्ट समोर आली आहे.

ती म्हणजे ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर रस्ता नसल्याने आजीला रुग्णालयात बैलगाडीतून नेण्याची वेळ आली. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांकडून मंत्री मुश्रीफांनी संबंधित अधिकाऱ्यांवर देखील फोन करून काम करण्याच्या सूचना द्याव्या, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी येथील केले अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी संघर्ष सुरू आहे. पासून काही अंतरावर जवळपास 15 ते 20 घरांचं वास्तव आहे. पास 40 ते 50 मतदारसंघ असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्याबाबतची निवेदन जिल्हा प्रशासन आणि मंत्री मुश्रीफ यांना देखील देण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.

मात्र निवडणूक संपतात सोयीस्कर रित्या मंत्री आणि जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. आज देखील हे ग्रामस्थ रस्त्यापासून वंचित आहेत. दरम्यान, आजारी असलेल्या आजीसाठी डॉक्टरांनी तपासणीसाठी हीच यावी अशी मागणी नातवाने केली होती. मात्र, रस्ता खराब असल्याने डॉक्टरांनी देखील त्याकडे पाठ फिरवली.

सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे यासाठी दाद मागत आता करण्याची मागणी या ग्रामस्थांकडून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथले अधिकारी बेताल बनले आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी अशा अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून, रस्त्याची मागणी पूर्ण करावी, अशी भावना या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

महिनाभरापूर्वी पत्नी गरोदर असताना तिला याच रस्त्यावरून रुग्णालयात नेले. सध्या आजीची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे बैलगाडीतून टाकून कच्चा रस्त्याने रुग्णालयात न्यावे लागले. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील आमची मागणी मान्य होत असल्याची खंत अर्जुन दळवी यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान याबाबत गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, असंही ग्रामस्थांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT