Congress exit plan : ठाकरे बंधूंच्या टाळीने काँग्रेस अस्वस्थ: महाविकास आघाडीतील एक्झिट प्लॅन ठरला; मुंबईतून पहिली घोषणा?

Congress unrest News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपात घोळ केला. त्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसला असून त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात असा सूर पाहवयास मिळाला.
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हालचालीना वेग आला आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्याचमुळे आता काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपात घोळ केला. त्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसला असून त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात असा सूर पाहवयास मिळाला.

हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू एकत्रीत येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इतर पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिका ही शिवसेनेचा गड मानला जात आहे. त्यामुळे बीएमसीची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Shivsena News: 'हिंदी सक्ती'चा निर्णय मागे घेताच शिवसैनिकांनी फडणवीस सरकारला दाखवली 'ठाकरे ब्रँड'ची ताकद

येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसनेही सावधपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मतदान उद्धव ठाकरेंना मिळाले परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मतदान काँग्रेसला ट्रान्सफर झाले नाही. हा मुद्दा बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी प्रभावीपणे मांडला.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
BJP Politics : BJP ने जाहीर केले 9 राज्यांचे कारभारी! 20 प्रदेशाध्यक्ष बदलणार

त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागावाटप करताना शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपात घोळ केला. त्यासोबतच काँग्रेसला त्यांनी ब्लॅकमेल केल्याची भावना आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईत काँग्रेस स्वबळावर उद्धव लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Dada Bhuse Politics : 'इंग्रजी शाळेत मुलं घालणाऱ्यांना मराठीवर बोलण्याचा अधिकार...', दादा भुसेंच्या टार्गेटवर ठाकरे

येत्या काळात उद्धव ठाकरेंसोबत लढल्यास पक्षाचे नुकसान होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूकीवर चर्चा झाली. ठाकरेंमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. मुंबईत तीन जागा कमी झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासोबतच राज्यातही काँग्रेसच्या काही जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत एकत्रित निवडणुका लढण्याची काँग्रेसची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
NCP Politics : बंडखोरांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा ‘यू-टर्न’! आभा पांडे पुन्हा पक्षात

आगामी काळात होत असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असा, मानणारा एक गट आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते तर दुसरीकडे जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष असणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Congress News: ...ते कुणाल पाटलांपर्यंत! दिल्लीत वजन असलेल्या जुन्या घराण्यांनीच सत्तेसाठी काँग्रेसचा मांडला खेळ!

काँग्रेसकडून येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी येत्या काळात पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस आपल्या संघटनेला स्थानिक पातळीवर मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Ajit Pawar correction : अजित पवारांनी 'ती' चूक सुधारली; पुरवणी मागण्यात एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना दिले झुकते माप

महाविकास आघाडीतील (MVA) इतर पक्षांसोबत जागा वाटपावर एकमत झाले नाहीतर येत्या काळात काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचा हा निर्णय घेतला जाऊ शकतो. काँग्रेसने येत्या काळात स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला तर पक्षाला मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Maharashtra BJP: अखेर प्रतीक्षा संपली! बावनकुळेंनंतर भाजपला नवा धडाकेबाज प्रदेशाध्यक्ष मिळाला

स्वबळावर निवडणूक लढण्याचा काही ठिकाणी काँग्रेसला (Congress) फायदा होऊ शकतो. जिथे त्यांची संघटना मजबूत आहे, त्याठिकाणी फायदा होणार आहे. तर दुसरीकडे आघाडीसोबत निवडणूक लढल्यास मिळणारा एकत्रित मतांचा फायदा होणार नाही. त्यामुळे विशेषतः भाजपसारख्या ताकदवान पक्षांसमोर लढताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस काय भूमिका घेणार? याची उत्सुकता लागली आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
TMC vs BJP : ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग लागणार? RSS-भाजपचे गावागावात 'मायक्रो प्लॅनिंग' तयार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com