Kolhapur Zilla Parishad New Constituencies Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP: कोल्हापूर सर्किट बेंचनं निवडणूक आयोगालाच धाडली नोटीस; 'ZP'च्या नव्या मतदारसंघाबाबत 22 ऑगस्टला निर्णय?

Kolhapur Zilla Parishad New Constituencies Case: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकच्या यंत्रणा गतिमान झाल्या असताना जिल्हा परिषदेच्या नव्या मतदारसंघ रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकच्या यंत्रणा गतिमान झाल्या असताना जिल्हा परिषदेच्या नव्या मतदारसंघ रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यानंतर त्यावर कोल्हापुरात (Kolhapur) निर्णय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गोकुळ शिरगाव, उचगाव गडमुडशिंगी आणि आजरा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रचनेबाबत दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात मंगळवारी सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाला त्यांचे म्हणणे पाठवण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय मतदारसंघ रचना तत्काळ अंतिम होणार असेल तर तातडीच्या हस्तक्षेपाची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे.

येत्या 22 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या (ZP) नव्या मतदारसंघाची रचना अंतिम होणार आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार संघाच्या संदर्भात करवीर तालुक्यातून चार आराखड्याविषयी आक्षेप घेत त्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

रावसाहेब पाटील यांनी गडमुडशिंगी, सचिन देशमुख उचगाव, शशिकांत खोत गोकुळ शिरगाव आणि संग्राम पाटील पाचगाव या मतदारसंघाबाबत याचिका दाखल केल्या होत्या. या चार मतदारसंघात रचना चुकीची झाली असल्याचा आरोप या याचिकेमध्ये नोंदवण्यात आला होता.

पंचायत समितीच्या मतदार संघाच्या रचनेत बदल केल्यास तो मान्य असावा. मात्र, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील बदल हा चुकीचा असल्याचा आरोप देखील या याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीसही काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, 22 ऑगस्टला ही मतदारसंघ रचनेची स्वरूप अंतिम होणार असल्याने नाऱ्याकडून याची के प्रकरणी तातडीचा हस्तक्षेप करण्यासही मान्यता दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी म्हणजे उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT