Maharashtra cabinet led by Devendra Fadnavis approves 34.36 hectares land for developing a new IT Park at Shendapark in Kolhapur to promote IT investment and employment. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur IT Park News: कोल्हापूरच्या रखडलेल्या आयटी पार्कबाबत मोठी अपडेट; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Shendapark IT Park Kolhapur : कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे आयटी पार्क उभारण्यासाठी 34.36 हेक्टर जमीन एमआयडीसीला देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय. या प्रकल्पामुळे आयटी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर शहरात आयटी पार्क व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्याने आयटी पार्कची आशा तरुणांनी सोडून दिली होती. आता कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी 34.36 हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज गुरूवारी (ता. 5) मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार शेंडापार्क परिसरातील गट क्रमांक 583, 587 आणि 588 मधील एकूण 34.36 हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना असून त्यातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याबरोबरच पुणे-मुंबईसारख्या शहरांबाहेरही आयटी क्षेत्राचा विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.

यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून परिसरात रोजगारासह मोठी आर्थिक उलाढाल होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT