Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: सस्पेन्स कायम; महायुती- माविआमध्ये संभ्रम; कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये...

Rahul Gadkar

Kolhapur: कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. महायुतीकडून दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी बदलाच्या चर्चा सुरू आहेत.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूर (Kolhapur) लोकसभेबाबतचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. तर हातकणंगले लोकसभाबाबत (Hatkanangle Lok Sabha Constituency 2024) नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीमध्येदेखील अद्याप दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीचा तिढा कायम असल्याचे भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने बुधवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. त्यात मात्र कोल्हापूर वा हातकणंगले मतदारसंघाचा समावेश नाही. शिवाय महाविकास आघाडीचा कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला असला तरी इंडिया आघाडीनेदेखील उमेदवारीची घोषणा केली नाही. या दोन्ही जागांचा दोन्ही आघाड्यांमधील तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता त्यामुळे ताणली गेली आहे. दुसरीकडे यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चलबिचलता आहे. महायुतीकडून संजय मंडलिक, समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांची नावे कोल्हापूर मतदारसंघातून चर्चेत आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने, विनय कोरे, शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची जागा भाजपने मागितली आहे. मात्र, ही जागा शिंदे गटाकडे गेल्याचे सांगितले जाते. शिंदे गटातून भाजपचे समरजित घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास कोल्हापूरच्या जागेवरचा प्रश्न निकाली लागल्याचे सांगितले जाते.

हातकणंगलेच्या जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे. या दोन्ही जागांबद्दल मुंबईत सातत्याने चर्चा सुरू आहेत. मात्र, कोणताही निर्णय झालेला नाही. एका बाजूला भाजप समरजितराजे घाटगे यांना कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे उमेदवारी मलाच मिळेल आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येऊ, असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT