Beed Lok Sabha Elections 2024: पंकजाताईंना खासदार करणं धनंजय मुंडेंसाठी महत्त्वाचं ठरणार; जिल्ह्यावर नेतृत्वाची संधी...

Beed Lok Sabha Constituency 2024: पंकजा मुंडे या केंद्रीय राजकारणात सक्रिय होतील, तर धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जिल्हा येईल.
 Beed Lok Sabha Elections 2024
Beed Lok Sabha Elections 2024Sarkarnama
Published on
Updated on

Beed: लोकसभा निवडणुकीतील 72 उमेदवारांची दुसरी लिस्ट भाजपने बुधवारी (ता.13) सायंकाळी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील वीसजण आहेत. भाजपने राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना बीडमधून (Beed Lok Sabha Elections 2024) उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आहे.

सलग दोनदा खासदार असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. या मागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पंकजा मुंडे या केंद्रीय राजकारणात सक्रिय होतील, तर धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जिल्हा येईल.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढविल्याने परळी विधानसभेची उमेदवारी कोणाला, असा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी धनंजय मुंडे जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यात कार्यरत होते. पंकजा मुंडे समाजकारणात सक्रिय हेात्या. त्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यापासूनच गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

त्यानंतर २०११ च्या परळी नगरपालिका निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत मुंडे यांच्यासोबत बंड करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. पुढच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे पराभूत झाल्या. पुढे विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादीने मागची २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविली होती. बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळवून देण्यात धनंजय मुंडेंचा मोठा वाटा होता. मात्र, सोनवणेंच्या विजयाचा पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द मुंडेंना खरा करता आला नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यापूर्वी २०१८च्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतही धनंजय मुंडे यांच्या शब्दाखातर राष्ट्रवादीने हक्काचा हिंगोली-परभणी मतदारसंघ काँग्रेसला देऊन लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आपल्याकडे घेतला. त्यावेळी भाजपमध्ये असलेले रमेश कराड यांना फोडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कराडांनी रणांगणातून पलायन केले होते. पुढे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली अशोक जगदाळेंनी निवडणूक लढविली, परंतु पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने अनपेक्षित विजय मिळविला.

 Beed Lok Sabha Elections 2024
Sudhakar Shringare: रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनात श्रृंगारे अवतरले अन् उमेदवारी फिक्स...

आता राजकीय चित्र आणि समीकरण अगदीच पालटले आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. आतापर्यंत राजकीय संधी टाळून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप या निमित्ताने पुसण्याचा प्रयत्न करतानाच राज्याच्या स्पर्धेतून भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंना केंद्राचा रस्ता दाखविला आहे.

धनंजय मुंडे यांनादेखील अनेक कारणांनी व अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ज्या कारणांनी दोन भावंडे दुरावली होती, त्याची परतफेड तर यानिमित्ताने होणारच आहे. शिवाय महायुतीतील प्रमुख मंत्री म्हणून तर त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असणारच आहे. शिवाय या निवडणुकीत यश आले तर सर्वाधिक श्रेयाचे वाटेकरी तेच असतील. त्याच बरोबर भाऊ म्हणून कर्तव्य आणि पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वाची संधीही मुंडेंना असेल.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com