Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha : छत्रपती घराण्यालाच काँग्रेसची साथ; पण ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात

Kolhapur Lok Sabha Constituency Election Who Is Maha Vikas Aghadi Candidate : कोल्हापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

Rahul Gadkar

Kolhapur Politics Latest News :

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत जर-तरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाकडे जाणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

शिवाय हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला तर कोणाला संधी दिली जाणार? जर शिवसेना Uddhav Thackeray गटाला गेला तर कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? अशी जर तर ची चर्चा गाव चावडीवर रंगू लागली आहे.

महाविकास आघाडीतून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती आणि गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या नावाभोवती उमेदवारीची चर्चा फिरत आहे. मात्र हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार? हे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही. काँग्रेसकडून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, तर शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. चेतन नरके निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसचे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या मतदारसंघात विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. विधानसभेच्या जागांनुसार मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेल्यास छत्रपती घराण्यातील नाव जवळपास निश्चित आहे. छत्रपती घराण्यातून माझी खासदार संभाजीराजे छत्रपती किंवा शाहू महाराज छत्रपती यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित होऊ शकते. तर दुसरीकडे ठाकरे यांनीही या मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विचार केल्यास जवळपास पाच मतदारसंघात केवळ एका जागेची मागणी केल्याची समजते. शिवसेनेच्या वाटेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव ठेवली असल्याचे सांगितले जाते. या तिन्ही जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी ठाकरे गट कुमकवत झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरील दावा सहज कोणी सोडणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT