Sangli News : वाकुर्डे जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीची चाचणी घेण्याआधी त्यामध्ये गळतीला सुरुवात झाली आहे. या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे. योजना ठेकेदारांसाठी नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी आहेत, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे. त्यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा झोडपून काढू, असा थेट इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. (Latest Marathi News)
ढगेवाडी (ता. वाळवा) येथील तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडण्यात आले. तेथील पाणी पूजन माजी खासदार शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, एस. यु. संदे, उदय गायकवाड, सौरभ पाटील, मोहन सावंत, शेकापचे नेते दादासाहेब सावंत उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेट्टी म्हणाले, "ढगेवाडी, मरळनाथपूर येथे चाचणीच्यावेळी जलवाहिन्या फुटल्या. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची जलवाहिनी का वापरली? टक्केवारी, भ्रष्टाचारासाठी शेतकऱ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल, अशी भूमिका अधिकारी घेणार असतील तर त्यांना झोडपून काढू. हे पाणी - गाव ओढ्यातून ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक, करंजवडे, देवर्डे, चिकुर्डे गावांच्या हद्दीत सोडण्यात येणार आहे. या पाण्याने जमिनीतील भूजल पातळीत वाढ होणार आहे. त्याचा फायदा विहीर, कूपनलिका यांना होणार असून, परिसरातील बागायत क्षेत्रात वाढ होणार आहे. (latest Marathi News)
वाळवा तालुक्यातील पश्चिम भागात पाण्याचा प्रश्न उद्भवला असताना वारणा धरणातील वाकुर्डे योजनेला पाणी मिळत नव्हते. तेथील गावांचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. पाच दिवसांपूर्वी वारणा कालव्याचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांच्याशी माझी खासदार शेट्टी यांनी फोनवरून संवाद साधत पाणीप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर ढगेवाडी येथील तलावात पाणी सोडण्यात आले. योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन टेस्टिंग करण्याआधी पाईपलाईन गळतीस सुरुवात झाली आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम आहे का? पहावे लागेल. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराच राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.