Prithviraj Chavan, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan On Narendra Modi : ...म्हणून मोदींकडून शेतकऱ्यांचा सूड, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप !

Rahul Gadkar

Kolhapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी मतं माववगायला येत असताना 10 वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे होतं. मात्र तसं न करता काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलत आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दागिन्यांवर हल्ला केला जाईल, संपत्तीवर छापा टाकला जाईल असं सांगितलं जातं. त्यांना 400 पार जाणार इतका आत्मविश्वास असेल तर काँग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल का बोलतात, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपची (BJP) कार्यप्रणाली आहे की सर्व काही फुगवून सांगायचे. पण जी उदाहरणे आहेत त्यानुसार 400 पार याला काहीच अर्थ नाही. सरकारी पैशाने 'मोदी की गॅरंटी' अशी जाहिरात केल्या जात आहेत. भारत सरकारची गॅरंटी म्हणत नाही तर केवळ मोदींची गॅरंटी म्हणतात. विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं काम हे करत आवाज दाबण्याचे कामं सुरु असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर करत काँग्रेस पक्षाची बँकेतील तीन खाती गोठवली आहेत. विरोधक प्रचार करू नये, अशी व्यवस्था करत आहेत. आपल्या मनाप्रमाणे माणसं नेमून काम केलं जात आहे. त्यामुळे लोकशाही राज्य व्यवस्था राहील की नाही अशी शंका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेते आणि खासदार ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे आम्हाला भीती आहे की हे संविधान बदलती. महागाई, बेरोजगारी, शेतकरी (FARMER) मुद्दे हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहे. कायदा मागे घ्यायला शेतकऱ्यांनी भाग पाडले त्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांचा सूड घेत आहे. असा गंभीर आरोप चव्हाण यांनी करत शेतीच्या मालाची किंमत वाढत नाही, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आपण सध्या लोअर इन्कम लेव्हलमध्ये आहोत. मोदी सरकारने लाखो हजार कोटींची उद्योगपतींची कर्जे माफ केली पणशेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाही. 100 दिवसात काळा पैसा भारतात आणू म्हटले होते. स्विस बँकेने सर्व माहिती भारत सरकारला दिली होती. ईडीचे लोक त्या माणसांकडे जातात मात्र सेटलमेंट करून कारवाई थांबवली जाते, असा आरोप देखील चव्हाण यांनी केला आहे.

कोरोना लसीचं कुणी राजकारण करू नये

निवडणूक रोख्याची माहिती मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. गेल्या निवडणुकीत (ELECTION) विरोधी पक्षाची मतं विभागली गेली मात्र आता आमची आघाडी झाली आहे.यावेळी आमची मतं विभागली जाणार नाहीत. गेल्या निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांमुळे आमचे 7 खासदार पराभूत झाले. मात्र यावेळी वंचितचा इफेक्ट फारसा नाही. यावेळी आम्हाला मोदी विरोधी लाट दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार नाही. एससी, एसटी आरक्षण काढून घेतले जाईल हा खोटा प्रचार केला जात आहे. आम्हीच हा कायदा आणला असताना आम्हीच तो बदलेल का?उलट तो कसा बळकट होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. कोरोना लसीचं कुणी राजकारण करू नये, लोकांचे जीव वाचवणे हे त्या सरकारचे काम आहे. त्यांनी काही जनतेवर उपकार केले नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.

मुंबई काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही.

निवडणुकीसाठी इच्छुक अनेक असतात मात्र उमेदवार एकच द्यावा लागतो. यामुळे काही नाराजी असते ती दूर होईल.काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्ती, मंगळसूत्र काढून घेणे असं नाही.नरेंद्र मोदी कमी शिकले असले तरी सुशिक्षित असावेत असं असताना ते चुकीचा प्रचार का करत आहे हे कळत नाही. इंडिया आघाडीचे काय होईल याची चिंता मोदी का करतात त्यांनी त्यांच्या पक्षाचे पहावे. कर्नाटकात सरसकट मुस्लिमांना नाही तर त्यांच्यातील 50 जातींना आम्ही केवळ शिक्षणात आरक्षण दिलं होतं. नोकरीमध्ये आरक्षण दिलं नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT