raju shetti uddhav thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti: दोन वेळा ठाकरेंना भेटलो, सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या...

Lok Sabha Election : "आपण पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही याचा निर्णय घेतला होता. कारण महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे राज्यामध्ये होतं, तेव्हा उसाची तीन टप्प्यांत एफआरपी करण्यात आली होती. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता."

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetti यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा न दिल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांच्या निर्णयामुळे आता हातकणंगलेची लढत चौरंगी होणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातील मतांचे विभाजन अटळ आहे.

मात्र, या मत विभाजनाची काळजी आपण करत नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर आपण पहिल्यापासून ठाम होतो आणि पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये MVA जायचं नाही हा आपला निर्णय होता, असंही त्यांनी सांगितलं. (Swabhimani Shetkari Sanghatana)

माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. निवडणूक लढवणं माझं काम आहे आणि निवडणूक लढवणार हे काय आज मी जाहीर केलेलं नाही. किती रंगी लढत झाली तरीही मी तयारी केली आहे. मतांच्या विभागणीची चिंता जे उमेदवार उभे करत आहेत, त्यांनी करावी मी काळजी का करू? असं म्हणत शेट्टी Raju Shetti यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, "आपण पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही याचा निर्णय घेतला होता. कारण महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे राज्यामध्ये होतं तेव्हा उसाची तीन टप्प्यात एफआरपी FRP करण्यात आली होती. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता. त्यासाठी आम्हाला संघर्ष करून एकरकमी एफआरपी घ्यावी लागली होती. आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं? म्हणून आम्ही बाहेर पडलो. शिवाय यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत येणार नाही असं सांगितलं होतं.

गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे. त्यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही. मात्र यामध्ये भाजपच्या BJP मतांची भर पडली तर निवडणूक सुखकर होईल म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. त्यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना भेटलो सुरुवातीला अनुकूलता दाखवली, मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहिती नाही. दोन्ही आघाड्यामधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत. मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू," असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीच्या VBA जागावाटपाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अजून कोणाला जातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचे असेल तर त्यांनी खुशाल उतरावं. हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे, असं म्हणत त्यांनी वंचितवर निशाणा साधला. तर धैर्यशील मानेंनी Dhairyashil Mane मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. हे केस पांढरे झाले ती चळवळीतून आणि अनुभवातून मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय आहे ते त्यांनी बघावं. जाईल तिथं लोक अडवत आहेत आणि मित्रपक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत, अशी टीका त्यांनी धैर्यशील माने यांच्यावर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT