Panjabrao Dakh News : आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक; परभणीतील ‘वंचित’चा उमेदवार बदलला; पंजाबराव डख यांना उमेदवारी

Loksabha Election 2024 : परभणीतील उमेदवारी आंबेडकर यांनी अचानक बदलली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांच्या जागी वंचितने ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Punjabrao Dakh-Prakash Ambedkar
Panjabrao Dakh -Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prabhani, 4 April : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी खेळी केली आहे. परभणीतील उमेदवारी आंबेडकर यांनी अचानक बदलली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांच्या जागी वंचितने ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. डख यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाची गोची करणार, हे याकडे लक्ष असणार आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने परभणी मतदारसंघासाठी (Parbhani Lok Sabha Constituency) लोकसभा उमेदवार म्हणून बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा दोन दिवसांपूर्वी झाली होती. पण आज पुन्हा वंचितने आपला उमेदवार बदलून पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांना उमेदवारी दिली आहे. पंजाबराव डख यांनी आज (ता. 4 एप्रिल वंचित बहुजन आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


Punjabrao Dakh-Prakash Ambedkar
Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांनंतर सांगोल्याचे देशमुख पवारांना भेटले; पवारांच्या मनात नेमकं काय?

परभणी लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, महायुतीकडून महादेव जानकर आणि वंचितचे पंजाबराख डख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. पंजाबराव डख यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो, हे प्रत्यक्ष निवडणुकीत दिसणार आहे.

कोण आहेत पंजाबराव डख?

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी पंजाबराव डख यांची ओळख आहे. ते परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचे रहिवासी आहेत. डख यांनी 1999 पासून हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू लागले. उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणा खुणांच्या अभ्यासावरून हवामानाच्या बदलांचा अंदाज ते वर्तवितात. अचूक हवामान अंदाजामुळे पंजाबराव डख संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. पंजाबराव डख हे मोबाइलवरून पावसाच्या अंदाजाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवतात.


Punjabrao Dakh-Prakash Ambedkar
Mohite Patil Meet Pawar : मोहिते पाटील गुढीपाडव्याला ‘शिवरत्न’वर बांधणार राष्ट्रवादीचे तोरण!; पवारांसोबत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com