Mahavikas Aghadi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahavikas Aghadi : बिंदू चौकात महाविकास आघाडी एकवटली!, तोंडाला काळ्या फिती बांधून केला निषेध

Rahul Gadkar

महाराष्ट्रातील वाढत्या महिलांच्या अत्याचारावरील घटनेच्या निषेधार्थ आणि बदलापूर घटनेत पोलिसांनी केलेल्या चुकीच्या तपासाविरोधात आज महाविकास आघाडीची मूक निदर्शने पार पडली. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात महाविकास आघाडी एकवटली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

खासदार शाहू महाराज छत्रपती, महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil), आमदार जयंत पाटील आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजीव बाबा आवळे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील, शिवसेनेचे संपर्क नेते विजय देवणे, काँग्रेसचे राहुल पाटील यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या निदर्शना दरम्यान, 'लाडक्या बहिणीचे लेक सुरक्षित कधी होणार?' 'भीक नको पैशाची सुरक्षा हवी लेकीची', 'महाराष्ट्राच्या लेकींना छत्रपतींचाच कायदा हवा', असे लक्षवेधी फलक दावण्यात आले.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बंद पुकाराला तो मागे घेण्यात आला. त्यामुळे आज महाविकास आघाडीने तोंडावर काळ्या फीत बांधून आंदोलन केले. बंद असलेला आवाज हा जनतेसमोर जायला पाहिजे. जनतेला काय योग्य? काय आयोग्य? समजले पाहिजे. सरकारने सुधारणा केली पाहिजे. सुव्यवस्था आणली पाहिजे. अशा प्रकारांना सुव्यवस्था म्हटली जावू शकत नाही. अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली.

बदलापूर (Badlapur) घटनेनंतर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आरोपी आणि त्याला मदत करण्याच्यावर अपेक्षित कारवाई झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला होता. मात्र न्यायालयाने हा बंद घेऊ नये, असे आदेश दिले. म्हणून न्यायालयाचा अवमान न करता संपूर्ण महाराष्ट्रभर मूक निदर्शने केली. राज्य सरकारने बदलापूर घटनेचा चुकीचा तपास केला याच्या विरोधात आम्ही निदर्शने केली आहेत.

"जे कोर्टात गेले ते सदावर्ते कोण आहेत? त्यांना पाठिंबा कोणाचा आहे हे? महाराष्ट्राला माहिती आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) विरोधात कोर्टात जाणारी माणसे कोण होती. हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. उच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेणे या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कोर्टात जाणारे हे सरकारच्या बाजूचेच आहेत. सामान्य माणसांना माहिती आहे गेल्या दोन वर्षातील आकडेवारी बघितली तर महिलांच्या अत्याचारावरील प्रमाण वाढले आहे. गृह विभाग नेमका काय करतोय गृहमंत्री नेमके काय करतात. मात्र जनता सर्व बघत आहे. मात्र भाजप दुतोंडी आहे बंगालमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्या पद्धतीने इथे आंदोलन केले पाहिजे होते." अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT