Leaders of BJP, Shiv Sena, and NCP arrive for the Mahayuti seat sharing meeting in Kolhapur, while Janasurajya’s participation remains uncertain amid political negotiations. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Politics : कोल्हापूर महापालिकीच्या जागावाटपात जनसुराज्यला स्थान नाही? महायुतीच्या बैठकीला विनय कोरे गैरहजर राहणार

Kolhapur Seat Sharing | Mahayuti Politics : महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी आज प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यामध्ये साधारण प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 19 Dec : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून सर्वच घटक पक्ष रिंगणात असणार आहेत. महायुतीमधून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. मात्र दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीला या जागा वाटपात स्थान मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

आज होणाऱ्या बैठकीला जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याबाबत त्यांना संपर्क साधला असा होऊ शकला नाही. प्रमुख नेत्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी आज प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यामध्ये साधारण प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

महायुतीच्या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आदिल फरास, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेत ही बैठक होणार असून यावेळी प्रत्येक पक्षाला किती जागा पाहिजेत, कोणकोणते प्रभाग आणि त्यातील जागा पाहिजेत, यावर प्राथमिक चर्चा होईल. शक्यतो सर्व निर्णय उद्याच्या बैठकीत होतील असे नाही. निवडणुकीचा कालावधी कमी असल्यामुळे ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक पक्षांतील उमेदवारांची मागणी नसेल तेथील निर्णय तातडीने होण्याची शक्यता आहे.

तर या बैठकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित चर्चा करून जागेचा फॉर्म्युला निश्चित करणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, आमदार विनय कोरे यांची कोल्हापूर महानगरपालिकेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. काल वाडी रत्नागिरी येथील गायमुख येथे झाडांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिके प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलायला नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT