Raju Jadhav, Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur MNS aggressive : राज ठाकरेंच्या मनसेत चाललंय तरी काय? 10 वर्षांपासून मराठीसाठी लढणारा मनसैनिक एकाकी

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

'म' मराठीचा आणि 'म' मनसेचा हे समीकरण आत्मसात करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महाराष्ट्रात नावारुपाला आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एक चळवळ-लढा सुरू केला. राज ठाकरेंच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा अभिमान राखत कार्य सुरू केले.

पण, कोल्हापूर जिल्ह्यात मनसे नावालाही शिल्लक नव्हती. अशातच एका महाराष्ट्र सैनिकांने दहा वर्षांपासून कोल्हापुरात मनसे जिवंत ठेवली आहे. मराठीसाठी झडणाऱ्या महाराष्ट्र सैनिकालाच आता मनसेने वाऱ्यावर सोडले की काय? अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवली आहे. वरिष्ठांनाही या महाराष्ट्रसैनिकांची दखल का घ्यावीशी वाटत नाही, हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मनसेचे (MNS) अस्तित्व आहे की नाही, याबाबत अनेकांना शंका आहे. अशा परिस्थितीत राजू जाधव (Raju Jadhav) या तरुणाने कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मनसे जिवंत ठेवली. प्रत्येक महिन्याला या ना त्या कारणाने आंदोलन करीत मनसेचा वचक अधिकाऱ्यांसह प्रशासनावर ठेवला.

पण मनसेच्या अंतर्गत पदाधिकाऱ्यांनीच जाधव यांना खंडणीबहादूर नावाची उपमा दिली गेल्याचे बोलले जाते. यातूनच वारंवार अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

चार दिवसांपूर्वी कणेरी येथील एका मठावर शेतकऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे दिशादर्शक फलक कन्नडमध्ये लावण्यात आले होते. कर्नाटकमध्ये मराठी भाषकांवर सुरू असलेला अत्याचार पाहता कणेरी येथील कन्नड फलकांना मनसेच्या राजू जाधव यांनी विरोध करीत ते बोर्ड काढून टाकत निषेध व्यक्त केला.

हे करताना त्यांना कणेरीवाडीतल्या ग्रामस्थांच्या संतापालाही सामोरे जावे लागले. पण, पोलिसांवर आलेल्या दबावामुळे या महाराष्ट्रसैनिकांवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद करण्यामागे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर साहजिकच इतर महाराष्ट्रसैनिकांनी हेवेदावे बाजूला सारून याविरोधात आवाज उठवण्याची गरज होती किंवा त्याची कल्पना वरिष्ठ पातळीवर देणे गरजेचे होते. तसे न करता जाधव यांनाच दोषी ठरवण्याचे काम अन्य पदाधिकारी करताना दिसतात. त्यामुळे मनसेचे मराठीप्रेम संपले की कार्यकर्त्यांनी संपवले, असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या पाच वर्षांत नेत्यांच्या दौऱ्याच्या वेळी उगवणाऱ्या महाराष्ट्रसैनिकांना बॅटरी घेऊन शोधण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या प्रकाराकडे कसे पाहतात, ते कार्यकर्त्यांच्या मागे राहणार का? याकडे इतर महाराष्ट्रसैनिकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT