Kolhapur News : कोल्हापूरमधील निमशिरगाव येथे डॉ. रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण व पी. बी. पाटील सहकारी संस्था उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, माजी आमदार उल्हास पाटील आणि राजीव आवळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांचं विधान जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार सतेज पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे शिंदे गटाच्या खासदारांनी सतेज पाटलांचा धसका घेतला की काय ? अशा चर्चेला उधाण आले आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी शरद पवारांची स्तुती करतानाच सतेज पाटील यांच्याबाबतही वक्तव्य केले. सतेज पाटील यांचं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांची कळ काढून चालत नाही, असे विधान केल्यानंतर सर्वत्र हशा पिकला. मात्र त्यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा ? असा सवाल उपस्थित होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंयचा नारा देत संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटील महत्त्वाचे ठरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी तुल्यबळ असली तरी सतेज पाटील हे महायुतीला आव्हान ठरू शकतात, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच खासदार धैर्यशील माने यांनी निवडणुकीपूर्वी सतेज पाटलांचा धसका घेतला की काय, अशीही चर्चा आहे.
आठवडाभरापूर्वी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल सयाजी येथे पार पडली होती. आगामी लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यातील उन्नती कशी असावी, याबाबतची चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे.
सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित आबा पाटील, आमदार राजू बाबा आवळे, गणपतराव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना एकत्र करून सतेज पाटील महायुतीच्या विरोधात रान उठवू शकतात. कदाचित याची भीती धैर्यशील माने यांना आहे का ? हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.