Gokul Controversy; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Controversy : मंत्री मुश्रीफांच्या डाव्या, उजव्या हातांनीच महाडिकांबद्दल तक्रारी केल्या, मुन्ना महाडिक म्हणतात, 'आता गोकुळचा निकाल 25-0'

Dhananjay Mahadik On Gokul Election : तुकाराम मुंढे यांनी या संस्था आवसायानात काढल्या होत्या. त्यामुळे अनेक संस्थांची चौकशी सुरू आहे. ज्या निकषात बसणार नाहीत, त्या संस्था अपात्र होतील.

Rahul Gadkar

Kolhapur News : चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून मागील काही निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या. त्यामुळेच स्वाभाविकपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादीचे काही नेते, मंत्री मुश्रीफ साहेब यांचे डावे-उजवे हात, त्यांच्या जवळच्या लोकांनी काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला. महाडिक साहेबांच्या काळातील टँकर बिल, दूध बिल हिशोब देण्याच्या तक्रारी केल्या. त्यांनी विनाकारण वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला. तसेच महाडिक यांनी, गोकुळमध्ये महायुतीचा निकाल 25-0 असा असेल असा विश्वासही व्यक्त केला. ते आज (ता.२) कोल्हापुरात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, हा दूध संघ कोणाच्या मालकीचा नाही. तो सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. केवळ पाच वर्षे नव्हे तर 25 वर्षाच्या चौकशीची मागणी केली तर ती झालीच पाहिजे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर कोणतीही वेगळी चर्चा होणार नाही. त्यामुळे आमदार शिवाजीराव पाटील हे देखील या प्रवाहात सामील होतील, असे खासदार महाडिक म्हणाले.

गोकुळ दूध संस्था ही शेतकऱ्यांची जीवन वाहिनी आहे. राज्यातील सर्वात मोठा दूध संघ असून सर्वात जास्त दूध संकलन आणि दहा दिवसाला आर्थिक मोबदला दिला जाणारा संघ आहे. या संघावर 25 वर्ष माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता होती. यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चोख आणि पारदर्शक कारभार झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील पाच वर्षात गोकुळमध्ये सत्तांतर झाले. मागील पाच वर्षात गोकुळमध्ये खूप काही झालं.

यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुती म्हणून लढायच्या सूचना दिल्या. आमच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली आणि सर्वांचे ठराव एकत्र गोळा करण्याचा निर्णय झाला असल्याचेही खासदार महाडिक म्हणाले. गोकुळ दूध संघामध्ये पात्र संस्था होण्यासाठी काही नियम आहेत. नियमानुसार सर्व गोष्टी झाल्यास त्या मतदानाला पात्र होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी तुकाराम मुंढे यांनी या संस्था आवसायानात काढल्या होत्या. त्यामुळे अनेक संस्थांची चौकशी सुरू आहे. ज्या निकषात बसणार नाहीत, त्या संस्था अपात्र होतील. त्या कोणाच्याही संस्था असल्या तर निकषात बसतील नसतील तर त्या अपात्र होणार, असेही खासदार महाडिक म्हणाले.

शेवटचे अध्यक्ष पद हे महायुतीच्या अध्यक्षांकडे होता. मात्र त्यापूर्वी चार वर्षाचा कारभार माजी पालकमंत्री यांच्याकडेच होता. जो भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला हा जग जाहीर आहे. काल त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते खरं आहे. पंचवीस वर्षे गोकुळ दूध संघ महाडिक साहेबांच्या हातात होता. त्यावेळी त्यांचा कारभार पारदर्शक होता. कोणालाही हस्तक्षेप करता येत नव्हता.

मात्र पाच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या राजकारणात हस्तक्षेप केला. सर्वांना एकत्र करण्याची खेळी यांच्या पुढाकारानेच झाली, अशी टीका माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नावं न घेता खासदार महाडिक यांनी करत त्यांचा चार वर्षाचा कारभार सर्व दूध संस्थांनी पाहिलेला आहे. त्यांचा पंधरा वर्षातील महापालिकेचा कारभार नागरिकांनी पाहिला. म्हणूनच सत्तांतर झाले.

यावेळी त्यांनी कितीही प्रयत्न केला तर गोकुळचा निकाल हा महायुतीच्या बाजूने राहणार आहे. जसा राजाराम सहकारी कारखान्याचा निकाल 21-0 असा झाला. जसा भीमा सहकारी साखर कारखान्याचा निकाल 15 -0 असा झाला. त्याच पद्धतीने गोकुळ दूध संघाचा निकाल 25 -0 असा होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT