

Gokul News गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यापासून दररोज नव्या घडामोडी घडत आहेत. सध्या उच्च न्यायालयात 1320 संस्थांच्या पात्रतेबाबत सुनावणी सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. पण याच आदेशातील एक शब्द वगळून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.
याचिकाकर्त्या दूध संस्थेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी केलेला प्रताप उघडकीस आणला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आदेशाचा परिच्छेद आहे तसा न देता 'फ्रॉम टुडे' शब्द वगळून गाडे याांनी विधी विभागाला पत्र दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री स्वामी समर्थ दूध संस्थेने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मूळ निकालातील आठ क्रमांकांच्या परिच्छेदात शेवटच्या वाक्यात '९० दिवस' या शब्दापुढे 'फ्रॉम टुडे' असे म्हटले आहे. मात्र, गाडे यांनी दिलेल्या पत्रात 'फ्रॉम टुडे' हा शब्द जाणीवपूर्वक वगळून विधी विभागाची दिशाभूल केली आहे, असा दावा श्री स्वामी समर्थ दूध संस्थेने केला आहे.
सचिव गाडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी वकील यांनी केलेल्या निवेदनानुसार निवडणूक प्रक्रिया ९० दिवसांत सुरू करावयाची आहे. तसेच, कोल्हापूर सर्किट बेंच यांच्या आदेशास अनुसरून १३२० संस्थांची अवसायन प्रक्रिया ८० दिवसांत पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करायची आहे.
यावरून असे स्पष्ट होते की, उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार अवसायन प्रक्रिया ८० दिवसांत पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील निवेदनानुसार निवडणूक प्रक्रिया त्यानंतर ९० दिवसांत घ्यावयाची आहे. अशी प्राधिकरणाची धारणा आहे. कृपया ही धारणा पक्की करावी, असे सचिव अशोक गाडे यांनी म्हटले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.