ACB officials caught Kolhapur Municipal Corporation encroachment superintendent Vilas Salokhe red-handed while accepting a ₹2000 bribe during a trap operation in Kolhapur. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Bribery Case : कोल्हापुरात अवघ्या 2 हजारांसाठी रंगपंचमी दिवशीच महापालिका अधिकाऱ्याने दाखवले खरे रंग! लाच घेताना रंगेहात ACB च्या जाळ्यात सापडला

Kolhapur ACB Trap : तक्रारदाराने रंगपंचमीच्या सणानिमित्त रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अतिक्रमणात असल्याचे सांगून त्यावर कारवाई करण्याची भीती दाखवत साळोखे याने कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 1500 रुपयांची लाच मागितली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News, 11 Mar : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरातील अतिक्रमण हटत नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांबद्दल संशय व्यक्त केला जात होता. अखेर नागरिकांचा तोच संशय खरा ठरला आहे.

अतिक्रमण विभागाचा मुख्य अधिकारीचा दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने लावलेल्या रंग विक्रीच्या स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा अधीक्षक विलास साळोखे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 10 मार्च) करण्यात आली. साळोखे याला सध्या अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराने रंगपंचमीच्या सणानिमित्त रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अतिक्रमणात असल्याचे सांगून त्यावर कारवाई करण्याची भीती दाखवत साळोखे याने कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 1500 रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे 10 मार्च रोजी प्राप्त झाली.

त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता साळोखे यांनी तक्रारदाराकडे 2000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान साळोखे यांनी तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताच पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

तपासा दरम्यान लाचेची रक्कम आरोपीने आपल्या बाईकवरील पिशवीत ठेवलेली आढळून आली. त्यामुळे बाईक व पिशवी पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार व प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT